Beed Abortion : मुलगी नको म्हणून बनाव करून टोचलं गर्भपाताचं इंजेक्शन; कापून बाहेर काढला अर्धवट गर्भ

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Jul 27, 2022 | 08:43 IST

बीड जिल्ह्यात (Beed district) माणुसकीला काळिमा फासणारा स्त्री भ्रृण हत्येचा गंभीर प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. गर्भवती (pregnant) राहिलेल्या विवाहितेला दुसऱ्यांदा मुलगी नको, मुलगाच जन्मायला हवा, या अट्टहासापायी सासरच्या लोकांनी एका तोतया डॉक्टरमार्फत (Doctor) बेकायदा (Illegal) गर्भलिंगनिदान (Pregnancy diagnosis) केले. विवाहितेच्या गर्भात मुलगीच असल्याची खात्री झाल्यानंतर विवाहितेला सासू-सासऱ्यांनी विश्वासघात करून गर्भपाताचे इंजेक्शन दिले.

The father-in-law did not want a daughter; The doctor cut and removed the fetus
सासरच्यांना नको होती मुलगी; डॉक्टरनं कापून बाहेर काढला गर्भ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • विवाहितेला सासू-सासऱ्यांनी विश्वासघात करून गर्भपाताचे इंजेक्शन दिले.
  • परळी शहरातील शिवाजीनगर भागात घडली घटना
  • घरी येऊन डॉक्टरनं केलं गर्भलिंग निदान

बीड : बीड जिल्ह्यात (Beed district) माणुसकीला काळिमा फासणारा स्त्री भ्रृण हत्येचा गंभीर प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. गर्भवती (pregnant) राहिलेल्या विवाहितेला दुसऱ्यांदा मुलगी नको, मुलगाच जन्मायला हवा, या अट्टहासापायी सासरच्या लोकांनी एका तोतया डॉक्टरमार्फत (Doctor) बेकायदा (Illegal) गर्भलिंगनिदान (Pregnancy diagnosis) केले. विवाहितेच्या गर्भात मुलगीच असल्याची खात्री झाल्यानंतर विवाहितेला सासू-सासऱ्यांनी विश्वासघात करून गर्भपाताचे इंजेक्शन दिले. यानंतर महिलेला त्रास आणि वेदना होत असल्याने शेवटी पीडितेचे हात आणि पाय पकडून गर्भ कापूर बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घृणास्पद घटना परळी शहरातील शिवाजीनगर भागात ही घटना घडली आहे.

विवाहितेने हा प्रकार आपल्या भावाला सांगितल्याने तो तिला घेऊन गेला. विवाहितेने पुण्यातील कोंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी हा गुन्हा बीड जिल्ह्यातील परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्यात वर्ग केला. याप्रकरणी नंदकुमार रामलिंग स्वामी (रा.बार्शी, जि.सोलापूर), पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, प्रक्षा कावळे अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात पुन्हा राजरोस गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे निदर्शनात आलं आहे. या घटनेविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परळी शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सरस्वती नारायण वाघमोडे ही विवाहिता दुसऱ्यांदा गर्भवती राहिली.

पहिली मुलगी असल्याने नवरा आणि सासूने गर्भलिंग निदान करण्याचा आग्रह केला. याला सरस्वतीचा विरोध होता. मात्र विरोध झुगारून मारहाण करतं गर्भलिंग निदान केले. मुलीचा गर्भ असल्याचं निदर्शनास आल्यानंतर गर्भपातासाठी आग्रह धरला. मात्र सरस्वती त्याला नकार देत होती. त्यातच थंडी-ताप आल्याने डॉक्टरांना बोलवून थंडी तापाचे इंजेक्शन देतो म्हणून विश्वासघाताने गर्भपाताचे इंजेक्शन दिलं.
सरस्वतीच्या फिर्यादीनुसार २०२० साली नारायण अंकुश वाघमोडेशी तिचे लग्न झाले. नारायण वाघमोडे हा परळी शहरातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचारी आहे. विवाहानंतर त्यांना सप्टेंबर २०२१ मध्ये एक मुलगी झाली असून ती दहा महिन्यांची आहे.

Read Also : उद्धव ठाकरे सूरतला गेले असते तर चित्र बदललं असतं का?

पहिली मुलगी झाल्याने आता दुसऱ्या वेळी विवाहिता गर्भवती असल्याने तिला मुलगी नको तर मुलगाच व्हायला हवा असा हट्ट तिच्या पतीसह सासूने धरला होता. बाळ कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी गर्भलिंगनिदान करण्याचे ठरवले. जर गर्भलिंगनिदानात मुलगी असेल तर गर्भपात करू, असे पती व सासू विवाहितेला म्हणू लागले. तेव्हा विवाहितेने मुलगा असो की मुलगी, मला गर्भपात करायचा नाही, असं सरस्वतीने सांगितले.

Read Also : आज सर्वोच्च न्यायालयात ईडीच्या अधिकाराविषयी सुनावणी

मात्र बळजबरीने घरीच पोर्टेबल मशीन आणत डॉ. स्वामींना बोलावून गर्भलिंग निदान करून सरस्वतीला विश्वासघाताने इंजेक्शन टोचले परंतु त्रास होत असल्यानं डॉ. स्वामींनी अक्षरश अमानुष पद्धतीने गर्भाचे तुकडे करून गर्भपात केला. यामध्ये सरस्वतीला आज देखील मोठ्या प्रमाणात वेदना होत आहे. दरम्यान, गर्भपात केल्याचं कोणाला सांगू नये म्हणून तिच्या पतीने आणि सासून तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

गुन्हा दाखल 

दरम्यान सरस्वती आपल्या भावाकडे गेली असताना तिने संतापून सासरी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने  तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ . स्वामी आणि प्रकाश कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३१३ , ३१५ , ३१८ , ३४ , ४९८ - अ , ५०४ , ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ जुलैला घेतला गर्भपाताचा निर्णय; दुसऱ्या दिवशी केला गर्भपात

जुलै महिन्यात विवाहितेला उलट्यांचा त्रास सुरू झाला तेव्हा विवाहितेच्या सासरच्या लोकांनी बार्शी येथील तोतया डॉक्टर नंदकुमार स्वामी याच्याशी गर्भलिंगनिदानासाठी संपर्क केला. त्यानंतर स्वामी १५ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता विवाहितेच्या सासूचा मेहुणा प्रकाश कावळे हा तोतया डॉ. स्वामीला घरी घेऊन आला. त्यानंतर एका वाहनातून सोनोग्राफी मशीनही आणली होती. डॉक्टरने सोनोग्राफी करून विवाहितेला तापासाठी इंजेक्शन देत सांगत गर्भपाताचे इंजेक्शन दिले. त्यानंतर दीड तासाने तिला पोटदुखीचा त्रास होण्यास सुरू झाला.

Read Also  :Budh Gochar: ऑगस्ट महिना या 5 राशींना करेल धनवान

सासऱ्याने गर्भाची विल्हेवाट लावली

सरस्वतीला त्रास होत असल्याने दुसऱ्या दिवशी पहाटे दीड वाजता डॉ. स्वामी पुन्हा विवाहितेच्या घरी आला. त्याने महिलेची तपासणी करून गर्भाशयाच्या पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर नातलगांच्या मदतीने गर्भ कापून तुकडे करून बाहेर काढला. पती, सासू आणि प्रकाश कावळे हे विल्हेवाटसाठी तो गर्भ घेऊन निघून गेले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी