Parabhani Murder Case बुरखा घातलेल्या महिलेसोबत रात्रभर फिरला अन् सकाळी केली हत्या

A woman in Parbhani has been killed with a stone on her head : २० सप्टेंबर रोजी सकाळी परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील रेल्वेस्थानकाजवळील एका मैदानावर रक्ताच्या थारोळ्यात एका  एका महिलेचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला.

A woman in Parbhani has been killed with a stone on her head
बुरखा घातलेल्या महिलेसोबत रात्रभर फिरला अन् सकाळी केली हत्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे महिलेचा खून केला
  • पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी तरुणाचा फोटो मिळवला आहे
  • डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला असावा पोलिसांनी व्यक्त केला संशय

परभणी : अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे महिलेचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात (Parabhani District) घडली आहे. खून झालेल्या महिलेची महिलेची ओळख अद्याप पटली नसून, पोलीस महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी तरुणाचा फोटो मिळवला असून, फोटोच्या आधारे पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत. पोलीस सुत्रांकडून  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने महिलेला मध्यरात्री रेल्वे स्थानकावर घेऊन फिरला, त्यानंतर बाजूच्या मैदानात घेऊन जाऊन तिची हत्या केली. यानंतर पोलिसांनी जवळ लागलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये सदर आरोपी दिसून आला आहे. खून प्रकरणातील अज्ञात आरोपीचे छायाचित्र पूर्णा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जारी केले आहे. या आरोपीला कोणी ओळखत असल्यास पूर्णा पोलिसांची संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. (women murdered in parabhani for unknown reason police probe on )

अधिक वाचा : मला कोणाला चुना लावण्याची गरज भासली नाही: एकनाथ खडसे

डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला असावा पोलिसांनी व्यक्त केला संशय

मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सकाळी परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील रेल्वेस्थानकाजवळील एका मैदानावर रक्ताच्या थारोळ्यात एका  एका महिलेचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी त्या महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला असावा, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला असून, पोलिसांनी तात्काळ मयत महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केले आहे.

अधिक वाचा ; 20 वर्षीय तरुणीवर आजोबा आणि काकांनी 12 वर्षे केला बलात्कार 

पूर्णा रेल्वेस्थानकावरील ओव्हरब्रिज आणि प्लॅटफॉर्मवर तरुण महिलेला घेऊन फिरत असल्याचा सीसीटीव्ही समोर

दरम्यान, सदर महिला आणि त्या तरुण व्यक्तीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने ती महिला मुस्लिम समाजातील असावी, असं दिसून येत आहे. कारण सीसीटीव्हीत दिसणाऱ्या या महिलेने बुरखा घातला असल्याचे दिसून येत आहे. महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पूर्णा पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले असता सोमवारी मध्यरात्री पूर्णा रेल्वेस्थानकावरील ओव्हरब्रिज आणि प्लॅटफॉर्मवर त्या महिलेला एक तरुण घेऊन जात असतानाचे फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी त्या फुटेजच्या आधारे आरोपीचा चेहरा निष्पन्न केला असून त्याआधारे आता पूर्णा पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली आहे.  महिलेचा शोध लागल्यानंतर तिच्या हत्येचे कारण देखील समोर येईल असं पोलिसांनी सांगितले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली असून, आरोपीचा लवकर शोध घेतला जाईल असा विश्वास दिला आहे.

अधिक वाचा ; मुंबई संकटात असताना ही गिधाडं कुठे असतात,उद्धव ठाकरेंचा सवाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी