बापरे! बिडी न दिल्याने कामगाराची दगडाने ठेचून हत्या

औरंगाबाद
Updated Nov 29, 2021 | 19:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

hotel worker stoned to murder : सदर घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. आणि पोलिसांनी घटनास्थळी श्वानाला घेवून आले आणि पोलिसांच्या श्वानानेही आरोपीला ओळखले.

hotel worker stoned to murder
बापरे! बिडी न दिल्याने कामागाची दगडाने ठेचून हत्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बिडी दिली नाही म्हणून कामगाराची हत्या करण्यात आली
  • मयत जयवंत शहरातील सत्कार भोजनालयात कामाला होता
  • सीसीटीव्हीच्या आधारे एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले

hotel worker stoned to murder ।  बुलढाणा : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. मुलींवर अत्याचार , त्याचबरोबर हत्येच्या घटनेत देखील वाढ होताना दिसत आहे. दरम्यान , आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एक धक्काद्यक घटना घडली आहे. एका हॉटेल कामगाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. बिडी दिली नाही म्हणून कामगाराची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेला मयत अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे.  जयवंत देशमुख असे मयत कामगाराचे नाव आहे. सदर हत्येप्रकरणी शेगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Workers stoned to death for not giving bidi in buldhana)

मयत जयवंत शहरातील सत्कार भोजनालयात कामाला होता

काही दिवसांपासून मयत जयवंत देशुमख हा शेगाव शहरातील सत्कार भोजनालय येथे कामाला होता. त्या ठिकाणी संतोष बाळू सरोदे हा तेथे पाणी आणि बिडी मागण्यासाठी गेला होता. संतोष सरोदेने बिडी आणि पाणी मागितले मात्र, संतोषला जयवंतने पाणी आणि बिडी दिली नाही. आपल्याला पाणी आणि बिडी दिली नाही याचा प्रचंड राग संतोष सरोदेला आला आणि त्याने याच रागाचा वचपा जयवंतवर काढला आणि जयवंतला दगडाने ठेचून ठार केले. शेगाव शहरातील श्री अग्रसेन चौक येथील दार्जिलिंग चहाच्या दुकानासमोर ही घटना घडली असून, या दुकान मालकाने घटनेची माहिती शेगाव शहर पोलिसांना दिली.

 

सीसीटीव्हीच्या आधारे एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. आणि पोलिसांनी घटनास्थळी श्वानाला घेवून आले आणि पोलिसांच्या श्वानानेही आरोपीला ओळखले. तर दुसरीकडे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता पाणी आणि बिडी देण्यास नकार दिल्याने आपण दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. त्याचबरोबर पोलीस देखील या युवकाची कसून चौकशी करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी