सुकेशनी नाईकवाडे(बीड): होय हे गारपीठ आणि अवकाळी पर्यटनच आहे. गारपीटमुळे झालेलं नुकसान पाहणे हे आमचं पर्यटनच आहे? असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. संजय राऊत यांनी अवकाळी आणि गारपीटीला पर्यटन म्हणून वक्तव्य केल्यानं, चर्चेला उधाण आलं होतं. त्याला सत्तार यांनी उत्तर दिले आहे.
अधिक वाचा : Girl Date 18 Boys : एका चुकीमुळे उघड झाला रोमान्स घोटाळा
बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे पिके नष्ट झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अवकाळी आणि गारपीटग्रस्त कोळवाडी, धनगरवाडी, पोखरी, पिंपरनई या गावातील नुकसानग्रस्त शेतपिकांची अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली, यावेळी ते बोलत होते.
अधिक वाचा : IPL 2023: अजिंक्य खेळी, वादळी फलंदाजीतून टीकाकारांना उत्तर
पुढे बोलताना ते म्हणाले, की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अवकाळीची पाहणी करतोय. शेतकऱ्यांचं बांधावर जाऊन दुःख समजून घेतो. हे जर संजय राऊत यांना पर्यटन वाटत असेल, तर होय हे अवकाळी पर्यटनच आहे. आयोध्याला जाणारे पर्यटन नाही, तर पवित्र ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जावून धनुष्यबाणाचं पूजन करणार आहोत. त्यानंतर जो विरोधकाकडे बाण येईल ते त्याला उत्तर मिळेल, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.