पार्थ पवारांना आजोळची साथ, तुम्ही जन्मजात लढवय्या आहात,आमदार पुत्राने केली पोस्ट

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 12, 2020 | 23:01 IST

Parth Pawar: शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले आहे. पार्थ पवार यांच्या विषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही.

You are a born fighter, malhar patil support to Parth Pawar!
पार्थ पवारांना आजोळची साथ, तुम्ही जन्मजात लढवय्या आहात,आमदार पुत्राने केली पोस्ट   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेवून, सीबीआय चौकशीची मागणी केली होती
  • शरद पवार यांनी आज पार्थ पवार यांच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अस म्हटलं
  • आज परत सांगतो.. पार्थ..लंबी रेस का घोडा है!! नितेश राणेंनी केले ट्वीट

उस्मानाबाद: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलच फटकारलं आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांची फटकारल्या नंतर भारतीय जनता पार्टीचे (bjp) आमदार राणाजगजितसिंह पाटील (mla ranajagajit sinh patil) यांचे पूत्र मल्हार पाटील (malhar patil) यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून, पार्थ पवार यांचा उल्लेख जन्मजात फायटर असा केला आहे. आमदार पुत्राने पार्थ पवार (parth pawar) यांची पाठराखण केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मल्हार पाटील यांनी सदर पोस्ट नातेसंबधातून केली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शरद पवार यांनी आज पार्थ पवार यांच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अस म्हटलं होतं. पवारांच्या या वक्तव्यानंतर मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबत असल्याचा सोशल मीडियाद्वारे इशारा दिला आहे.

You are a born fighter and I’ve seen that since I was a child. I’m proud of you. We are from Osmanabad, we know how to fight.

Posted by Malhar Patil on Wednesday, 12 August 2020

काय म्हणाले शरद पवार?

दरम्यान शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले आहे. पार्थ पवार यांच्या विषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं, माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही, त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. दरम्यान पार्थ पवार यांना जरी शरद पवार यांनी फटकारले असेल, तरी त्यांनी सीबीआय चौकशीला विरोध नसल्याचंही म्हटलं आहे.

नितेश राणे यांनीही केले ट्विट

शरद पवार यांनी पार्थ पवार यांची कानउघडणी केल्या नंतर नितेश राणे यांनी देखील ट्वीट केले आहे. नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान राणे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं, आज परत सांगतो.. पार्थ..लंबी रेस का घोडा है!! थांबू नकोस मित्रा म्हणत पार्थ पवार यांना सपोर्ट केला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पार्थ पवार यांनी केली होती मागणी 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. सुशांत सिंह ठाकूर यांच्या आत्महत्येनंतर चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी अनेकांची चौकशी केली आहे. मात्र सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या नेमकी का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुशांत सिंह यांच्या आत्महत्येची चौकशी लवकर करण्यात यावी, यासाठी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेवून, सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

जवळचे नातेसंबंध

पार्थ पवार यांचे वडील अजित पवार आणि मल्हार पाटील यांचे आजोबा डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे. पार्थ पवार यांच्या भूमिकेला सर्वात आधी आजोळातून सर्वप्रथम समर्थन मिळत असल्याने चर्चेला उधाण आले आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी