बीड : राज्यात गुन्हेगारांना कायद्याचे धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. हत्या, बलात्कार, दरोडा यासारखे प्रकार राज्यात दररोज होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात तर गुन्हेगारीचा आलेख चढता असल्याचे दिसत आहे. २७ वर्षीय तरुणाचा दोन दिवसांपूर्वी बीड शहरात (beed city) दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. किरकोळ कारणावरून सदर तरुणाची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा हत्येची घटना घडली आहे. सतत होत असलेल्या हत्येच्या घटनेने जिल्ह्यातील सामन्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अधिक वाचा : आज काँग्रेस पक्षात मोठी घडमोड, या कारणामुळे नेते उतरणार रस्त
मिळालेल्या माहितीनुसार, , गेवराई शहरात घरात घुसून तिघांनी एका तरुणाला गंभीरपणे मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. सदर हत्येची घटना काल ७ वाजून ३० मिनीटांच्या दरम्यान घडली आहे. बाबू शिवराम शिनोरे असं असं हत्या करण्यात आलेल्या मयत तरुणाचे नाव आहे. बाबू शिनोरे हा गेवराई शहरातील संजय नगर गेवराई येथे राहत होता. मयत बाबू शिनोरे हा रात्री साडेसातच्या दरम्यान राहत्या घरी असताना, जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघे बाबू शिनोरे यांच्या घरी आले. आणि थेट घरात घुसून बाबूला जबर मारहाण केली. या मारहाणीत बाबू शिनोरे यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात गेवराई पोलीस ठाण्यात फोन द्वारे माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.
अधिक वाचा ; गेल्या 24 तासात कोरोनाचे २३२५ नवीन रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू
पोलिसांनी बाबू हा गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे पाहून त्याला तत्काला गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेले. या ठिकाणी डॉक्टरांनी बाबू शिनोरे यांची तपासणी केली. आणि त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी गेवराई पोलिसांकडून आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर, आरोपीं पळून गेले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच बीड शहरात भरदिवसा एका २७ वर्षीय तरुणाचा खून झाला होता. या खुनानंतर काल रात्री पुन्हा एकदा खून झाल्याने बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा धाक उरलाय की नाही ? असाच प्रश्न समोर येत आहे. तसचं २ दिवसात झालेल्या २ खुनामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.
अधिक वाचा : या फोटोत आहेत दोन Tiger, १५ सेकंदात पूर्ण करून दाखवा चॅलेंज