LIVE BLOG
More UpdatesMore Updates

CM Uddhav Thackeray : खोटं बोलणं आमचे हिंदुत्व नाही, संभाजीनगरची शान वाढविणारे काम करणार आणि मगच नाव बदलणार...

आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. सायंकाळी ८ ते ९ या कालावधीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. औरंगाबादचा पाणी प्रश्न असो वा शहराचे सुशोभिकरण, तसेच एमआयएम असो वा मनसे असो. भाजपवर तर चांगलेच तोंडसुख घेतले.

CM Uddhav Thackeray 
फोटो सौजन्य:  BCCL
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray  : औरंगाबाद :  आज सायंकाळी पाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. सायंकाळी ८ ते ९ या कालावधीत मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. औरंगाबादचा पाणी प्रश्न असो वा शहराचे सुशोभिकरण, तसेच एमआयएम असो वा मनसे असो. भाजपवर तर चांगलेच तोंडसुख घेतले. 

Jun 08, 2022  |  09:24 PM (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादची सभा ऐका जशीच्या तशी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादची सभा ऐका जशीच्या तशी
Jun 08, 2022  |  09:05 PM (IST)
हिंदुत्व... हिंदुत्व... म्हणजे काय : मुख्यमंत्री

औरंगाबाद : हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वला बदनाम करुन शिवसेना बदनाम होणार नाही. आमचे हात ढकणं चिरडण्यासाठी नाही. तर हिंदुत्वाच रक्षण करण्यासाठी आहे, असे उध्दव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

Jun 08, 2022  |  09:01 PM (IST)
सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली? : ठाकरे

औरंगाबाद : एक जमाना होता की देशाच्या कानाकोपर्‍यात शिवसेना-भाजप राजकारणात अस्पृश्य होतो, कारण हिंदुत्ववादी. 25-30 वर्षे तुम्हीं आमचा उपयोग करुन घेतला. प्रत्येक आंदोलनात खांद्याला खांद्या लावून रस्त्यावर उतरत होते. मग आज केंद्रात सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली?, असा सवाल उध्दव ठाकरे यांनी केला

Jun 08, 2022  |  08:34 PM (IST)
काश्मीरमध्ये जावून हनुमान चालिसा म्हणा : मुख्यमंत्री

औरंगाबाद : काश्मीरमध्ये दिवसाढवळ्या हिंदूची हत्या होतेय. त्यांचा जीव वाजवा. तिथे जावून हनुमान चालिसा म्हणा किंवा दुग्धाभिषेक करा, तेव्हा कळेल तुमचे हिंदुत्व, अशी टिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर केली.

Jun 08, 2022  |  08:32 PM (IST)
आम्ही हिंदूत्व सोडलं नाही : ठाकरे

औरंगाबाद : कोणाला हिंदूत्व शिकवताय. बाबरी मशीद पडली तेव्हा अडवाणी आणि वाजपेयींनी माघार घेतली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी ठणकावून सांगितले होते. बाबरी पाडणारा शिवसैनिकच होता, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले

Jun 08, 2022  |  08:29 PM (IST)
संभाजीनगर केल्याशिवाय राहणार नाहीत- ठाकरे

औरंगाबाद : संभाजीनगर करण्याचे वचन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांनी दिले होते. ते मी विसलो नाही. ते संभाजीनगर केल्याशिवाय राहणार नाही. नाव का आता बदलू शकतो. नावाला सार्थ असं शहर असले पाहिजे. पहिल्यांदा विमानतळ नाव केंद्राकडून बदलून आणा. आक्रोश करायचा तो तिकडे करा, अशी टिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपवर केली.

Jun 08, 2022  |  08:10 PM (IST)
हिंदुत्वाची गर्जना करणारी सभा : संजय राऊत

औरंगाबाद : उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने चांगली दिशा दिली आहे. देशाभरातील लोक उध्दव ठाकरे यांच्याकडे आशेने बघत आहेत. शिवसेनेची संभाजीनगरची सभा ही हिंदुत्वाची गर्जना करणारी सभा आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यांनी व्यक्त केले. 

Jun 08, 2022  |  08:08 PM (IST)
उध्दव ठाकरे सभास्थळी दाखल

औरंगाबाद : औरंगाबाद मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभास्थळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले. त्यांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. या सभेसाठी महाराष्ट्राभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Jun 08, 2022  |  05:14 PM (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकडे रवाना 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या शासकीय निवासस्थान वर्षाहून औरंगाबादसाठी रवाना झाले आहेत. 
 

Jun 08, 2022  |  05:13 PM (IST)
हे संभाजीनगर आहे, संभाजी राजांची आठवण इथे केली पाहिजे - सुभाष देसाई

औरंगाबादचे संभाजीनगर या संदर्भात बोलताना पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, औरंगाबाद शहराचे नाव स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर केलेले असून आताही संभाजीनगरच आहे. कागदोपत्री काही गोष्टी राहिल्या असून त्याही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होतील. मात्र आता औरंगाबाद शहराचे नाव हे संभाजीनगरच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा मोठी विराट होणार असून या सभेला हे मैदान पुरणार नसल्याने औरंगाबाद शहरातील विविध मैदानामध्ये मोठ्या स्क्रीनद्वारे सभेचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
 

Jun 08, 2022  |  05:12 PM (IST)
उस्मानाबाद जिल्ह्यातुन हजारो शिवसैनिक औरंगाबादकडे रवाना

उद्धव ठाकरे यांच्यासभेसाथी उस्मानाबाद जिल्ह्यातुन साधारण ६०० ते ७०० वाहनांतून हजारो शिवसैनिक औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.  शिवसैनिकांच्या उपस्थितीने औरंगाबाद चक्काजाम होईल असा दावा उस्मानाबादचे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी यांना व्यक्त केला आहे.
 

Jun 08, 2022  |  05:11 PM (IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर पावसाचे सावट

औरंगाबादमध्ये पावसाची हजेरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर पावसाचे सावट