Beed: बीडः बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील टाकळसिंग दैठणाचे ग्रामस्थ 23 वर्षांपासून नदीवर पूल होण्याची प्रतिक्षा करत आहेत. पूल नसल्यामुळे ग्रामस्थ ट्युबच्या मदतीने नदी ओलांडत आहे. या प्रकारात ग्रामस्थांच्या जीवाला मोठा धोका आहे. पण सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांचा नाईलाज झला आहे. आता गावातील 200 शेतकरी नदीवर पूल व्हावा यासाठी उपोषणाच्या तयारीत आहेत. (200 farmers from Beed crosses river through tube)
अतिवृष्टी, धुकं आणि पिकांवर पडणारे आजार यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. वर्षभरात 268 शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडल्यामुळे आत्महत्या केली. यामुळे गावातील उर्वरित शेतकरी सरकारी मदत तातडीने मिळावी तसेच नदीवर लवकर पूल व्हावा यासाठी उपोषण करण्याच्या तयारीत आहेत.
अधिक वाचाः ट्रेनमधून तो कोसळला, मदतीसाठी पोलीस देवदूतासारखा धावला