अजित पवारांच्या दौऱ्यात पोलिसांनी केला कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज, पहा व्हिडीओ

औरंगाबाद
Updated Jun 18, 2021 | 16:03 IST

Ajit Pawar, Health Minister Rajesh Tope reportedly gheraoed by contractual health workers Marathwada visit; शेकडो कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा व राजेश टोपे याच्या गाडीचा ताफा अडवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला

थोडं पण कामाचं

  • शेकडोच्या संख्येने जमा झाले होते आरोग्य कर्मचारी
  • शेकडो कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा व राजेश टोपे याच्या गाडीचा ताफा अडवला
  • पवारांच्या दौऱ्यात युवकाने केली घोषणाबाजी

बीड : बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल २ तास ३० मिनिटे बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर त्यांचा ताफा बाहेर निघाला असता कोविड च्या काळात काम करणाऱ्या कॅत्राटी कर्मच्याऱ्यांना निवेदन घेऊन भेटू दिले नाही म्हणून या शेकडो कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा व राजेश टोपे याच्या गाडीचा ताफा अडवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं आहे. दरम्यान, यावेळी पोलिसांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला आहे.

शेकडोच्या संख्येने जमा झाले होते आरोग्य कर्मचारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यासठी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते गोळा झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरु असताना, या कंत्राटी कर्मचाऱ्याना अजित पवार आणि राजेश टोपे यांना भेटू दिले नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार आणि राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निघताच त्यांच्या गाडीचा ताफा अडवला, मात्र या कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेताच मंत्र्यांच्या गाढयाचा ताफा पुढे निघाला यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. म्हणून पोलिसांना या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. 

अजित पवारांचा पुढील दौरा उस्मानाबाद येथे 

अजित पवार यांचा एक दिवसीय मराठवाडा दौरा असून, औरंगाबाद मार्गे ते बीड येथे आले असून, बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम , आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेणार असून, पवार यांचा पुढील दौरा हा उस्मानाबाद जिल्ह्यात असून, ते उस्मानाबाद जिल्ह्यतील खरीप हंगाम आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेणार आहेत. आणि यानंतर ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. 

पवारांच्या दौऱ्यात युवकाने केली घोषणाबाजी

 बीड जिल्ह्याच्या आढावा बैठक सुरु असताना, बाहेर एका युवकाने जोरजोरात घोषणा दिल्या. दरम्यान, घोषणा दिलेल्या युवकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. अजित पवार बीड जिल्ह्याच्या खरीप हंगाम , आणि कोरोना परस्थितीचा आढावा घेत असताना सदर प्रकार घडल्याने काही काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न होतोय युवकाने दिल्या घोषणा

दरम्यान, सदर युवकाने मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न होतोय, मी हात जोडून या सरकारला विनंती करत होतो असं देखील हा युवक व्हिडीओ मध्ये बोलताना आपल्याला पहायला मिळत आहे. सदर तरुणाचे नाव हनुमंत फपाळ असं आहे. मराठा क्रांती ठीक मोर्च्यांचे हनुमंत फपाळ याना जिल्हाधिकारी कार्यल्याच्या प्रांगणात अडवण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी ते जाणार होते मात्र त्यांना भेटू न दिल्याने हनुमंत फपाळ यांनी घोषणा दिल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी