मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी पदयात्रेला निघालेल्या शिवसैनिकाचे निधन, कुटुंबीयांनी व्यक्त केली मदतीची अपेक्षा

औरंगाबाद
Updated Dec 26, 2021 | 18:17 IST

beed shivsainik death मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  दीर्घायुष्य लाभावे तसेच आगामी निवडणूकीत शिवसेनेला यश मिळावे यासाठी बीडच्या एका शिवसैनिकाने तिरुपतीला नवस केला होता.

थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  दीर्घायुष्य लाभावे यासाठी बीडच्या एका शिवसैनिकाने तिरुपतीला नवस केला होता.
  • पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले.
  • उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Shivsainik Death : बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  दीर्घायुष्य लाभावे तसेच आगामी निवडणूकीत शिवसेनेला यश मिळावे यासाठी बीडच्या एका शिवसैनिकाने तिरुपतीला नवस केला होता. नवस फेडण्यासाठी तब्बल 1100 किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले.  उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. (beed shivsainik pray for cm uddhav thackeray died while padyatra)

बीडमधील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर आपल्या लाडक्या नेत्याला दीर्घायुष्य लाभो म्हणून तिरुपतीला साकडे घालण्यासाठी पायी जात होते. पदयात्रेदरम्यान ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर अक्षरशः दुःखाचे डोंगर कोसळले आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्री पर्यंत ओळख होती. घरातली कर्तीधर्ती व्यक्तीचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. आता जगायचे कसे हा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला आहे. 
 

सुमंत रुईकर हे 1995 पासून शिवसेनेत कार्यरत आहेत. बीड जिल्ह्यात मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. सामाजिक असो आरोग्यदायी का असो, कुठल्याही अडीअडचणीला सुमंत हे धावून जायचे आणि पीडित लोकांना मदत मिळवून द्यायचे. शिवसेनेत शिवसैनिक म्हणून काम करत असताना त्यांनी कुटुंबाची कधीही पर्वा केली नाही. संपूर्ण समाजाला रुईकर कुटुंब म्हणायचे मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचं कुटुंब पोरकं झालं आहे. 26 वर्ष शिवसेनेसाठी अहोरात्र काम करत असताना शिवसेनेने आता सुमंत यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावं अशी मागणी नातेवाईक करीत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी