Corona Third Wave : भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सुरूवात झाली आहे, या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येणार नाही, राजेश टोपे यांची माहिती

औरंगाबाद
Updated Jan 10, 2022 | 20:42 IST

Corona pandemic Third Wave भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला हजेरी लावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

थोडं पण कामाचं
  • भारतात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सुरूवात झाली आहे.
  • या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येणार नाही.
  • कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

Corona Third Wave : जालना : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (india corona third wave) सुरुवात झाली आहे  या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला हजेरी लावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (corona third wave in india says maharashtra health minister rajesh tope )

टोपे म्हणाले की, सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.  विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे असे आवाहन आवाहन टोपे यांनी केले. तसेच  सध्या शाळा बंदच राहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाच पालन करत नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांत वाढ झाल्यानेच निर्बंध लावले असून लोकांची काळजी घेणे गरजेचं आहे. जान है तो जहान है असं सांगत उद्योग सुरू असलेच पाहिजे पण काळजी घेणंही महत्वाचं ,आहे असं टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला उत्तरं देत म्हटलं आहे. आज मनसुख मांडवीय यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती,सध्या उपलब्ध असलेली साधन सामुग्री याबाबत चर्चा झाली असून ECRP 2 चा निधी खर्च करण्याबाबत चर्चा झाली असून आता निधी खर्च करण्याला वेग येईल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. राज्यातील नादुरुस्त ऑक्सिजन प्लांट दुरुस्त करून घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले.बूस्टर डोस, लहान मुलांना लसीकरण वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्याचं टोपे म्हणाले. 

तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील

गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला होता. ते जालन्यात पत्रकारांशी बोलताना टोपे म्हणाले होते की, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे नवे निर्बंध लागू करण्यात आलेत आहेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी जरी वाढली असली तरी हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाहियेत असे टोपे यांनी यावेळी सांगितले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी