ST concession: तरच यापुढे एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिक करू नाही शकणार सवलतीचा प्रवास, जाणून घ्या महत्वाची अपडेट

औरंगाबाद
Updated Jul 25, 2022 | 19:57 IST

ST concession for senior citizen : आता एसटी महामंडळाच्या बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेच कार्ड चालणार नाही या अगोदर आधार कार्ड मतदान कार्ड वरती जेष्ठ नागरिकांना प्रवासामध्ये सूट देण्यात येत होती

थोडं पण कामाचं
  • एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करायचे असेल तर महत्त्वाची बातमी
  • आता एसटी महामंडळाच्या बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेच कार्ड चालणार नाही
  • या अगोदर आधार कार्ड मतदान कार्ड वरती जेष्ठ नागरिकांना प्रवासामध्ये सूट देण्यात येत होती

ST Senior citizen concession, औरंगाबाद :   आता एसटी महामंडळाच्या (MSRDC) बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतेच कार्ड चालणार नाही या अगोदर आधार कार्ड मतदान कार्ड वरती जेष्ठ नागरिकांना प्रवासामध्ये सूट देण्यात येत होती मात्र आता एसटी महामंडळाच्या वतीने स्मार्ट कार्ड काढण्यात आले असून हे स्मार्ट कार्ड घेण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे, अशी माहिती औरंगाबाद  (Aurangabad) मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांनी दिली आहे. (Discounted travel not available to senior citizens in ST, know important update)

31 ऑगस्ट नंतर एसटी प्रवासामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या प्रकारची कोणतीही ओळखपत्र चालणार नाही ज्येष्ठ नागरिकांनी 31 ऑगस्ट पर्यंत आपल्या जवळच्या आगारातून स्मार्ट कार्ड घ्यावे असे आवाहन आज रोजी करण्यात आले आहे.

अधिक वाचा :  इन्कम टॅक्स रिटर्न भरताना मिळणार 2.5 लाखांची अतिरिक्त सूट

आधारकार्ड दाखविल्यावर ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध होत होते. यामुळे राज्यभरातील असंख्य विशेषतः जे नागरिक म्हणत असायचे की उशीरा जाईल पण एसटीने जाईल. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आली आहे. आतापर्यंत वयाच्या पुराव्यासाठी आधारकार्ड ओळखपत्र अशा माध्यमातून सवलतीच्या दरात तिकीट देण्यात येत होते. पण आता स्मार्टकार्ड असेल तरच तुम्हांला सवलतीच्या दरात तिकीट मिळणार आहे. यामुळे मोठ्या गावातील नागरिकांना ही सुविधा घेणे सहज शक्य होणार आहे. पण दुर्गम भागातील अशिक्षित आणि गरिबांना ही सुविधा मिळविणे कठीण होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी