Eknath Shinde: "याकुब मेमनचा हस्तक होण्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा हस्तक होणं कधीही चांगलं"

औरंगाबाद
Updated Sep 14, 2022 | 19:55 IST

Eknath Shinde Speech: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

Eknath Shinde on opposition: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झालं. यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू झाला. मविआच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. दहशतवादी याकुब मेमनच्या कबरवर सजावट आणि लायटिंग केल्याचा प्रकार समोर आला आणि या मुद्द्यावरुनही विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Eknath shinde said it is better to be agent of narendra modi and amit shah than yakumb memon dawood ibrahim watch video)

साबणाने धुलाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काल परवा रोखठोकमध्ये लिहिलं की, एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे आहेत. पण याच साबणाने तुमची मस्त धुलाई केली हे विसरु नका. आधी बाळासाहेबांचे विचार बुडवले मग हिंदुत्व बुडवले. मग बाळासाहेबांच्या विरोधकांसोबत हातमिळवणी केली. केवळ सत्तेच्या मोहापायी दोन्ही काँग्रेसला जवळ केलं. बाळासाहेबांना धोका कोणी दिला, त्यांचे विचार पायदळी कोणी तुडवले? हे आधी महाराष्ट्राला सांगा.

हे पण वाचा : रात्री नाभीमध्ये टाका 'हे' तेल, मिळतील जबरदस्त फायदे

मोदी आणि शहांचे हस्तक होणे कधीही चांगले

एकनाथ शिंदे, शिंदे गट हे अमित शहा यांचे हस्तक आहेत, मोदींचे हस्तक असल्याचं म्हटलं. याकुब मेमन जो द्रोशद्रोही होता. ज्याला फाशी दिली त्याच्या कब्रस्तानाचं उदात्तीकरण केलं.. कोणाच्या काळात केलं? याकुब मेमन आणि दाऊदचा हस्तक होण्यापेक्षा ज्याने बाळासाहेबांचे विचार पुढे केले अशा नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी... यांनी 370 कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला अशा नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे हस्तक होणं केव्हाही चांगलं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

हे पण वाचा : सलमान खानसमोर ढसाढसा रडली होती कतरिना, कारण...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दररोज आपल्यावर काही ना काही आरोप करण्यात येत आहेत. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलाच मुख्यमंत्री होऊ शकतो का? तुम्ही कितीही काहीही केलं तरी आमचं काम आम्ही करत राहणार. काल कुणीतरी रोखठोकमध्ये लिहिलं, लाचार शिंदे गट... शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे.. आता टीका करण्यापलिकडे त्यांच्याकडे उरलं नाही. सकाळी उठल्यावर टीका, दुपारी टीका आणि रात्री झोपण्यापूर्वी टीका... सकाळ, दुपार आणि रात्रीचे तीन डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ काही थांबत नाही.

फक्त निवडणूक आली की, मराठीचा मुद्दा पुढे करायचा. मुंबई महाराष्ट्रपासून वेगळी करत आहेत.. असं फक्त बोलायचं. निवडणूक संपल्यावर आपला मराठी माणूस मुंबई सोडून का चालला आहे याकडे दुर्लक्ष करायचं. आज लालबाग, परळ, दादर, भांडूप, मुलुंडमधील घराघरात जात आहेत. असेत जर तुम्ही पूर्वी केलं असतं आणि मराठी माणसाची दु:ख समजून घेतली असती तर मुंबईतला मराठी टक्का कमी झाला नसता हे दुर्दैवाने मी सांगू इच्छितो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी