Aurangabad : सध्या देशा पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पेट्रोल डिझेलचे दर हे जास्तच आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशावेळी औरंगाबादच्या सय्यद रझाक यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. आपल्या मुलाला त्यांनी एक घोडा घेऊन दिला आहे. रझाक यांचा मुलगा घोड्यावरूनच जिथे जायचे असेल तिथे जातो आणि त्यामुळे पेट्रोलव होणारा खर्च वाचत आहे.
गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहे. त्यावर उपाय म्हणून औरंगाबादच्या सय्यद रझाक यांनी आपल्या मुलाला एक घोडा विकत घेऊन दिला आहे. त्यांच्या मुलाने आपली गाडी घराबाहेर ठेवली असून आता घोड्यावरून रपेट मारण्यास सुरूवात केली आहे. गाडी ऐवजी घोड्यावर जाणे हे किफायतशीर असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली आहे. त्याच्या घोडेस्वारीमुळे स्थानिक त्याच्याकडे कुतुहलाने बघत आहे. परंतु पेट्रोल डिझेलच्या भाववाडीवर हा योग्य उतारा असल्याचे रझाक यांनी सांगितले आहे. पूर्वी गाडी १०० रुपयांचे पेट्रोल टाकावे लागायचे आता अवघ्या तीस रुपयांमध्ये घोडा फिरतो, त्याला चारा आणि पाणी लागतं. यामुळे शेतकर्याचाही फायदा आहे असेही रझाक यांनी सांगितले. सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे अन्यथा महागाई आणखी वाढेल अशी मागणी रझाक यांनी केली आहे.