fake currency : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अटक

औरंगाबाद
Updated Dec 29, 2021 | 18:45 IST

Gang arrested for printing counterfeit notes in Aurangabad : महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली. बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अटक केली.

थोडं पण कामाचं
  • fake currency : बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अटक
  • पाच जणांना अटक
  • तीन लाख दहा हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Gang arrested for printing counterfeit notes in Aurangabad : औरंगाबाद : महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली. बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अटक केली. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटक केलेल्यांकडून तीन लाख दहा हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भाडेपट्टीवर घेतलेल्या जागेत बनावट नोटांची छपाई सुरू होती, असे पोलिसांनी सांगितले. मुकुंदवाडीत बनावट नोटांची छपाई होत होती.

बनावट नोटा प्रकरणात किसन ढवळपुरेने दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी समरान उर्फ लकी रशीद शेख, नितीन कल्याणराव चौधरी, अक्षय अण्णासाहेब पडूळ ,दादाराव पोपटराव गावडे आणि रघुनाथ चंदन दास ढवळपुरे या पाच जणांना अटक केली. आरोपींकडून १ लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. यात प्रामुख्याने ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा आहेत. 

नोटांच्या छपाईसाठी लागणारे कागद, ऑल इन वन प्रिंटर, कटर, स्केल, कॉम्प्युटर हे साहित्य तसेच एक महिंद्रा लोगन कार आणि पाच मोबाइल पोलिसांनी जप्त केले. बनावट नोटा प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कंप्यूटर ,ऑल इन वन प्रिंटर कटर स्केल , कागद असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा लोगन कार आणि संपर्कासाठी वापरण्यात आलेले 5 मोबाईल असा एकूण 3 लाख 10 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी