Devendra Fadnavis : गोपीनाथ मुंडेचे स्वप्न पूर्ण, आता रेल्वे परळीपर्यंत नेणार - देवेंद्र फडणवीस 

औरंगाबाद
Updated Sep 23, 2022 | 15:29 IST

बीड जिल्ह्यातील बहू प्रतिक्षित आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ आज झाला आहे. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ झाला

थोडं पण कामाचं
  • बीड जिल्ह्यातील बहू प्रतिक्षित आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ आज झाला आहे.
  • रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ झाला
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न पाहिले होते

बीड : बीड जिल्ह्यातील बहू प्रतिक्षित आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ आज झाला आहे. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते या सरकारने पूर्ण  केले असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

अखेर आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गावर धावली पॅसेंजर रेल्वे

पुढील काळात वेगाने काम पूर्ण होईल देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. 1995 साली हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. माञ आज अखेर 22 वर्षांनंतर या लोहमार्गावर प्रत्यक्ष पॅसेंजर रेल्वे धावली, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी आष्टीकरांनी मोठी गर्दी केली होती. 

अहमदनगर आणि बीड या दोन जिल्हयाला हा मार्ग जोडला गेलाय. दिवंगत केशर काकू क्षीरसागर, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी यासाठी मोठे प्रयत्न केले होते. या लोहमार्गाचे लोकार्पण झाले असून आज पासून नियमित ही रेल्वे धावणार आहे. रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार प्रीतम मुंडे यांनी या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला आहे.

मार्च 2023 पर्यंत बीड पर्यंत रेल्वे धावेल असा विश्वास रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तर  पुढील काळात अतिशय वेगाने या पुढचं काम पूर्ण होईल असं माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी