Ambadas Danve । चाळीस गावं काय एक इंचही जमीन मिळू देणार नाय, अंबादास दानवेंचं कर्नाटक सरकार उत्तर

औरंगाबाद
Updated Nov 25, 2022 | 13:28 IST

Aurangabad : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा निषेध
  • कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका चुकीची

औरंगाबाद : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाला महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका चुकीची आहे, असे महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठणकावून सांगितले. (Government of Karnataka Answer by Ambadas Danve)

अधिक वाचा : अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

केंद्राने हस्तक्षेप करून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना असे वक्तव्य करण्यापासून रोखावे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचा खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही ते बिनधास्त विधाने करत आहेत, असे दानवे पुढे म्हणाले.

सोमवारी, बोम्मई म्हणाले की त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर सीमा विवाद प्रकरण हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि कर्नाटकमधील वरिष्ठ वकिलांची एक मजबूत कायदेशीर टीम तयार केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी