Imtiyaz Jaleel: औरंगाबाद शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्या दुवा फाउंडेशनच्या वतीने आयजे फेस्टचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन रविवारी सायंकाळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार खासदार इम्तियाज जलील जिल्हाधिकारी अस्तित कुमार पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या गोलंदाजीवर इम्तियाज जलील हे 'क्लीन बोल्ड' झाले. (imtiyaz jaleel clean bold on bowling of abdul sattar watch video)
यानंतर या संदर्भात जलील यांना विचारले असता, ते म्हणाले की मी स्वतःहून आऊट झालो आहे. सत्तार मला कधीही आऊट करणार नाही ते नेहमी मला जिंकण्यासाठी मदत करतील. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.