Rajesh Tope : तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा

औरंगाबाद
Updated Jan 09, 2022 | 17:56 IST

rajesh tope on wine shops गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

थोडं पण कामाचं
  • गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील
  • राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नवे निर्बंध
  • राज्यात ऑक्सीजनची मागणी वाढली आहे परंतु त्याचे प्रमाण नगण्य

Rajesh Tope : जालना : गर्दी होत असेल तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे नवे निर्बंध लागू करण्यात आलेत आहेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी जरी वाढली असली तरी हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाहियेत असे टोपे यांनी यावेळी सांगितले.  (maharashtra health minister on crowd and restrictions in maharashtra corona pandemic)

नव्या निर्बांधमध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत मात्र दारुची दुकानं सुरु असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. परंतु तिथेही जर गर्दी होत असेल तर दारूची दुकानंही बंद करावी लागतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेण्यात येईल. राज्यात ऑक्सीजनची मागणी वाढली आहे परंतु त्याचे प्रमाण नगण्य आहे. 18 वर्षांवरील कोरोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला असा अहवाल असला तरी ICMR ने याबाबतीत सूचना कराव्या त्याची अंमलबजावणी केली जाईल असेही ते म्हणाले. मुंबईतील कोविड सेंटरमध्ये पारदर्शकता नाही असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे, यावर तक्रारीनंतर पारदर्शक चौकशी करून कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी