restrictions : राज्यातील निर्बंध, रात्रीच्या संचारबंदीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील - राजेश टोपे

औरंगाबाद
Updated Jan 08, 2022 | 20:38 IST

Maharashtra Health Minister Rajesh Tope statement related with restrictions in state : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी ऑक्सीजनच्या मागणीत वाढ झालेली नाही. या परिस्थितीत राज्यात निर्बंध लावावे की लावू नये आणि निर्बंध लावायचेच असतील तर नेमके कोणते या बाबतचे निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

थोडं पण कामाचं
  • राज्यातील निर्बंध, रात्रीच्या संचारबंदीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील - राजेश टोपे
  • कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी ऑक्सीजनच्या मागणीत वाढ झालेली नाही
  • महाराष्ट्रात शुक्रवारी ४० हजार ९२५ नवे कोरोना रुग्ण आढळले

Maharashtra Health Minister Rajesh Tope statement related with restrictions in state : जालना : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी ऑक्सीजनच्या मागणीत वाढ झालेली नाही. या परिस्थितीत राज्यात निर्बंध लावावे की लावू नये आणि निर्बंध लावायचेच असतील तर नेमके कोणते या बाबतचे निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. रात्रीच्या संचारबंदीबाबतचे निर्णय पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. ते सतत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नागरिकांच्या हितासाठी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील; असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात शुक्रवारी ४० हजार ९२५ नवे कोरोना रुग्ण आढळले. ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी वाढ झाली नाही पण काही ओमायक्रॉनबाधीत बरे झाले. यामुळे शुक्रवारी राज्यात १ लाख ४१ हजार ४९२ कोरोना आणि ४४१ ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले; अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

नागरिकांनी कोविड प्रोटोकॉल पाळावा, मास्क घालावा. राज्य शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करावे आणि गर्दी टाळावी. ही खबरदारी घेतली तर कोरोना लवकर नियंत्रणात येईल; असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला. ते जालन्यात बोलत होते.

हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांची सरकारला काळजी आहे त्यामुळे विचारपूर्वकच निर्बंधाबाबत निर्णय घेतले जातील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.ओमायक्रॉनचा पुढील प्रकार अत्यंत धोकादायक राहील असा इशारा केंब्रीजच्या प्राध्यापकांनी दिलाय. मात्र यावर निष्कर्ष समोर येईपर्यंत बोलणं उचित होणार नाही,असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत असल्यास त्यांच्या लगेच चाचण्या करुन घ्या; असे टोपे म्हणाले. महाराष्ट्रात ज्येष्ठांना प्रिकॉशनरी डोस सोमवार १० जानेवारीपासून दिला जाईल. आधी ज्या लसचे दोन डोस घेतले आहेत त्याच लसचा प्रिकॉशनरी डोस घेता येईल. प्रिकॉशनरी डोससाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नियमावली जारी केली आहे. या नियमांचे पालन केले जाईल.

महाराष्ट्राकडे ६० लाख कोविशिल्ड आणि ४० लाख कोवॅक्सिन लसच्या डोसचा साठा आहे. आणखी डोस केंद्राकडून यायचे आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या संकटामुळे आता परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला सात दिवस क्वारंटाइनचे बंधन लागू केले आहे; अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेल्या एक हजार ९९६ जणांपैकी एकानेही एकही डोस लस घेतलेली नाही. बाधितांपैकी बहुसंख्य हे लसचा एकही डोस न घेतलेल्यांपैकी आहेत. यामुळे लस घेणे नागरिकांच्या हिताचे आहे. लस टोचून घेण्यास टाळाटाळ करू नये; असे राजेश टोपे म्हणाले. विशिष्ट औषधांचा आणखी पुरवठा केंद्राकडून हवा आहे. यासाठी राज्य शासन केंद्राच्या संपर्कात असल्याचे राजेश टोपेंनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी