महिला पोलिसाच्या हातावर खासदार जलील यांनी मारला फटका, जलील यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबाद
Updated Jun 02, 2021 | 18:42 IST

MP Jalil slaps female police officer : शहरात लॉकडाऊनच्या दुकानं सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली होती.

थोडं पण कामाचं

  • कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती
  • आम्ही काय मनोरंजनासाठी, चित्रपट पाहायला नाही आलो – खासदार जलील
  • कामगार आयुक्त यांनी जलील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला

औरंगाबाद : कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून सतत चर्चेत असणारे औरंगाबाद जिल्ह्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP imtiyaz jaleel) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, इम्तियाज जलील यांचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ (shokking video) सोशल मिडिया वर तुफान व्हायरल झाला आहे. सदर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये जलील मोबाईल मध्ये व्हिडीओ काढणाऱ्याच्या हातावर मारत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जलील यांनी कोणाच्या हातावर मारलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल? दरम्यान, झाल असं की, दुकानावर कारवाई का केली म्हणून कामगार आयुक्तांना जाब विचारण्यासाठी जलील आणि त्यांचे समर्थक गेले असता, यावेळी सदर घटना घडली आहे.

कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली होती

शहरात लॉकडाऊनच्या दुकानं सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली होती. मात्र, आयुक्तांनी कारवाई केल्याचा राग खासदार महोदयांना आला आणि त्यानी थेट आयुक्त कार्यालय दुकानदारांना घेऊन पोहोचले. यावेळी खासदार हे अधिकाऱ्यांना बोलत असताना एक महिला पोलीस कर्मचारी सदर घटनेचे चित्रीकरण करत होती. चित्रिकरण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

आम्ही काय मनोरंजनासाठी, चित्रपट पाहायला नाही आलो – खासदार जलील

कामगार आयुक्तांच्या कार्यालयात लोकांनी एकच गर्दी केली होती त्यामुळे सोशल डिस्टिंगचा पुरता फज्जा उडाला होता. याच जमलेल्या जमावाचे एक महिला पोलीस कर्मचारी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होत्या. चित्रिकरण करत त्या जलील यांच्यापर्यंत पोहोचल्या. तेव्हा जलील यांनी मोबाईल खाली पाडण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांचा हातावर फटका मारला. त्यामुळे मोबाईल खाली पडला. एवढंच नाहीतर, 'आम्ही काय मनोरंजनासाठी, चित्रपट पाहायला नाही आलो. जमत नसेल तर बाहेर उभे राहा, अशा शब्दांत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जलील यांनी खडे बोल सुनावले. 

कामगार आयुक्त यांनी जलील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला

दुकानात हातावर पोट असणारे कामगार काम करत आहे. तूला काही वाटत कसं नाही? तर दुसरीकडे, 'लॉकडाऊनमुळे आधीच लोकांचे रोजगार बुडाले आहे. अशी एकेरी भाषेत जलील यांनी कामगार आयुक्तांशी बाचाबाची केली असल्याचे व्हिडीओ मध्ये देखील दिसत आहे. एवढंच नाहीतर ५० हजारांचा दंड का ठोठावण्यात आला, असा आरोपही जलील यांनी केला होता. मात्र, आपण असा कोणताही दंड स्विकारला नाही, असा दावा कामगार आयुक्त व्हिडीओत करत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी कामात अडथळा आल्याचे आरोप जलील यांच्यावर करण्यात आला असून, अखेर कामगार आयुक्त यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी