उस्मानाबाद: राज्यात कोरोनाचे रुग्ण (corona patient) दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन (lockdown) देखील करण्यात आले आहे. त्याचबरोबर, मंदिरात देखील भाविकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सोनरीच्या काळ भैरवनाथची यात्रा देखील रद्द करण्यात आली असून कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्या अनुषंगाने यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे काळ भैरवनाथ मंदिर (kal bhairavanath) समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून जर वर्षी काळ भैरवनाथची यात्रा ७ ,८ ,९ मे रोजी असते. मात्र कोरोनाचा वाढती संख्या पाहता सदर यात्रा रद्द करण्यात आली आहे. भक्तांनी सोनारीत गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. कोरोना असल्याने राज्यात रक्ताचा तुटवडा असून यात्रेवर केला जाणार खर्च टाळून रक्तदान शिबिर आयोजित करित या समितिने एक आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान, मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे की, देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, राज्यात रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. याच कारणामुळे भैरवनाथ ट्रस्टच्या वातीने रक्तदानाचा उपक्रम भाविक आणि ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आला आहे. चैत्र महिन्यात ७ , ८ , ९ मे रोजी असते, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भाविक भक्तांनी घरीच बसून दर्शन घ्यावे, असं देखील मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thakre) यांनी ब्रेक द चेन अभियान जाहीर केले आहे. त्यानुसार तुळजाभवानी मंदिर खुले राहणार आहे मात्र भाविकांना दर्शनासाठी उद्यापासून मंदिरात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. तुळजाभवानी देवीच्या (tuljabhavani temple) पूजा या देवीचे महंत करतील मात्र भाविकांना मंदिरात प्रवेश नसणार आहे. भाविकांनी न येण्याचे मंदीर प्रशासनाचे आवाहन केले असून ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले आहे.
पुढे बोलताना पुजाऱ्यांनी म्हटलं आहे की, उद्यापासून भाविकाना बंदी असेल तर पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मागच्या ८ ते ९ महिन्यांपासून पुजारी वर्ग घरात बसून होता. २ महिन्यापासून त्यांच्या उपजीविकेचे साधन सुरु झाले होते. मात्र, मंदिर बंद होणार असेल तर, पुजारी आणि लहान व्यापाऱ्यांची परस्थिती पुन्हा एकादा बिकट होणार असल्याचे पुजाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.