सुकेशनी नाईकवाडे, बीड : भाजपच्या कुशीतील वाढलेली मी खरीखुरी कार्यकर्ता आहे. भाजप आणि मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. (Pankaja Munde spoke for the first time on the news of outrage)
तसेच भाजप पक्ष हा काही एक व्यक्ती नाही ती संस्था आहे, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे. तसेच भाजपाचे सर्व प्रोटोकॉल मी पाळले आहेत.. असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या..
बीडच्या गेवराई येथे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ आले असता जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या.