बीडमधील सावरकर गौरव यात्रेला प्रीतम आणि पंकजाची दांडी, काय आहे मुंडे भगिनींची स्ट्रॅटेजी?

औरंगाबाद
Updated Apr 06, 2023 | 14:39 IST

Savarkar Gaurav Yatra in Beed: बीड जिल्ह्यात भाजपच्यावतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. मात्र, या यात्रेत पंकजा आणि प्रीतम मुंडे या अनुपस्थित असल्याचं पहायला मिळालं.

थोडं पण कामाचं
  • बीड जिल्ह्यात भाजप - शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली
  • गौरव यात्रेत भाजपच्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे अनुपस्थित
  • राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण

सुकेशनी नाईकवाडे (बीड)

Savarkar Gaurav Yatra : बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात आली. भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधत बीड जिल्ह्यात ही गौरव यात्रा काढण्यात आली. राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्याकंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे, त्याला उत्तर म्हणून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा : अंड्यासोबत हे पदार्थ खाणे टाळा अन्यथा होईल घोटाळा

बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी बाईकवरून रॅली काढण्यात आली तर काही ठिकाणी पदयात्रा काढण्यात आल्या. या यात्रेत पदाधिकारी कार्यकर्ते आणि सावरकर प्रेमी नागरिकांनी मोठया संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं होत. मात्र भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांची यात्रेत अनुपस्थिती दिसून आली. या भगिनींच्या अनुपस्थितीमुळे मोजकेच कार्यकर्ते या यात्रेत दिसून आले.

हे पण वाचा : झटपट नोकरी बदलावी की नाही?

बीड जिल्ह्यातील भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या सभा, कार्यक्रम, आंदोलनात मुंडे भगिनींची अनुपस्थिती पाहवयास मिळाली. याबद्धल माध्यमांनी पंकजा मुंडे यांना आपण पक्षावर नजर आहेत का अशी विचारणा केली असता त्यांनी नाराज नसल्याचं ही सांगितलं आहे. मात्र जिल्ह्यात पक्षाचा कार्यक्रम अन् मुंडे भगिनी अनुपस्थित नेमके कारण काय कारण ? असा सवालही उपस्थित होताना दिसून येत आहे. तसेच राजकीय वर्तुळात चर्चा होतांनाही दिसून येत आहेत.

हे पण वाचा : रात्री इनरवेअर घालून झोपावे की नाही?

राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढल्या जात आहेत. या यात्रेत त्या त्या भागाचे आमदार, खासदार, मंत्री सहभागी होत आहेत. मात्र बीड जिल्हात मुंडे भगिनी मात्र दिसून येत नाहीत आणि त्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी