Shiv Sena: मी आता मैदानात उतरलोय; काय होईल ते बघून घेऊ: चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire challenged Minister Sandipan Bhumre: मी आता मैदानात उतरलोय, काय होईल ते बघून घेऊ..' असं म्हणत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदिपान भुमरेबाबत संताप व्यक्त केला आहे.

 shiv sena leader chandrakant khaire directly challenged minister sandipan bhumre
Shiv Sena: मी आता मैदानात उतरलोय; काय होईल ते बघून घेऊ: चंद्रकांत खैरे 
थोडं पण कामाचं
  • चंद्रकांत खैरे मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर संतापले
  • मंत्री संदिपान भुमरे यांना दिलं खैरेंनी आव्हान
  • शिवसेना विरुद्ध शिंदे गट आमनेसामने

Aurangabad ShivSena: औरंगाबाद:  'मी आता मैदानात उतरलोय, काय होईल ते बघून घेऊ..' असे थेट आव्हान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे सरकारमधील मंत्री संदिपान भुमरे यांना दिलं आहे. 'मी एकनाथ शिंदेंकडून 20 लाख आणले हे सिद्ध करा अन्यथा सुळावर चढा.' अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिली आहे. 

'संदिपान भुमरेने कोणाला मोठे होऊ दिले नाही. सगळा खोटरडापणा लावला आहे. मी त्याला मोठं केलं त्याने एक झेंडा देखील लावला नाही.' असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

'हे सर्व आमदार आगामी निवडणुकीत पडतील हे मी ठामपणे सांगतो.' असा दावाही खैरे यांनी यावेळी केला आहे. तसेच पालकमंत्री झाल्यानंतर संदिपान भुमरे यांच्या प्रत्येक निर्णयावर माझ लक्ष आहे असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी आता भुमरेंविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. त्यामुळे आता याबाबत मंत्री संदिपान भुमरे नेमकी काय भूमिका घेतात आणि चंद्रकांत खैरे यांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी