सरकार कधीच सेफ नसतं, शिवसेनेच्या 'या' मंत्र्याने केलं वक्तव्य

औरंगाबाद
Updated Jun 21, 2021 | 19:12 IST

Shiv Sena minister made a big statement : महाविकासआघाडी सरकार हे तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांनी बनवलं असून, सरनाईक यांना जे वाटलं ते मनमोकळेपणाने बोलले असं देखील म्हटलं आहे.

थोडं पण कामाचं

  • माझ्या घरावर पण धाड टाकून झडती घेतली - शंकरराव गडाख
  • शेतकरी आंदोलनाची नोटीस प्रकरणात सत्तेचा दुरूपयोग करीत धाड टाकली
  • महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष सुरक्षीत आहे - गडाख

उस्मानाबाद : उस्मानाबाद  (Osmanabad) जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सरकार कधीच सेफ नसत मात्र, मागविकासआघाडी सरकार ५ वर्षे टिकणार अशी ग्वाही दिली आहे. महाविकासआघाडी सरकार हे तिन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांनी बनवलं असून, सरनाईक यांना जे वाटलं ते मनमोकळेपणाने बोलले असं देखील म्हटलं आहे. ( Shiv Sena minister made a big statement on mahavikas aghadhi govt)

नेमकं काय म्हणाले शंकरराव गडाख?

प्रताप सरनाईक यांनी त्यांच्याभावना मनमोकळ्या पणाने व्यक्त केल्या आहेत. मनात एक , ओठात एक, आणि कृती करताना तिसरी करावी लागते, तरच राजकारण यशस्वी होत, असं देखील गडाख यांनी म्हटलं आहे. राजकारण करत असताना अनेक कटू प्रसंग येतात त्यावेळेस माणूस भावनावश होतो. अलीकडच्या काळात कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार सुरु झाला आहे. तो महाराष्ट्राला नवीन आहे. असं देखील गडाख यांनी म्हटलं आहे.

माझ्या घरावर पण धाड टाकून झडती घेतली

जलसंधारण मंत्री शंककरराव गडाख यांनी उस्मानाबाद येथे त्यांना सत्तेचा वापर करून दिल्या गेलेल्या त्रासाबद्दल भावना व्यक्त केल्या. माझ्या घरावर पण धाड टाकून झडती घेतली व मला त्रास दिला गेला, असा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकार मधील आणखी एका मंत्र्याने तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकारवर केला आहे.

शेतकरी आंदोलनाची नोटीस प्रकरणात सत्तेचा दुरूपयोग करीत धाड टाकली

मागच्या ५ वर्षांपूर्वी जेव्हा मी आमदार नव्हतो तेव्हा माझ्या घरावर शेतकरी आंदोलनाची नोटीस प्रकरणात सत्तेचा दुरूपयोग करीत धाड टाकली गेली. शेतकरी आंदोलन प्रकरणात दाखल गुन्ह्यात कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आली नाही. कोर्टात शेवटची तारीख असल्याने मी यापूर्वी नोटीस न मिळाल्याने हजर झालो नाही म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या २० ते २५ जणांच्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली व झडती घेतली आणि मला त्रास दिला. 

महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष सुरक्षीत आहे

राजकीय द्वेषातून अलीकडच्या काळात कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार सुरू झाले आहेत ते महाराष्ट्रला नवीन आहे. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष सुरक्षीत आहे, काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षाच्या प्रमुखांनी किमान समान कार्यक्रमवर आधारित सरकार स्थापन केले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांना जे पत्र लिहले त्यात त्यांनी भावना व्यक्त केल्या,राजकारण करत असताना कुटुंबावर अनेक कटू प्रसंग येतात. राजकारणात ज्यांना त्रास झाला ते त्रासाबद्दल त्यांना आलेले अनुभव बोलत आहेत. सरनाईक यांनी भाजप सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला होता त्याच अनुषंगाने मंत्री गडाख यांनी सुद्धा भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला.

गडाख हे अपक्ष निवडून आले होते

गडाख हे अपक्ष निवडून आले होते त्यानंतर त्यांना जलसंधारण मंत्री शिवसेनेच्या कोट्यातून करण्यात आले. त्यानंतर गडाख यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केला होता. त्यामुळे त्यावेळी आपण आता ज्या शिवसेना पक्षात आहात त्याच पक्षाचे आपणास त्रास दिला गेला त्यावेळी सत्ता होती यावर विचारल्यावर त्यांनी भाजपचे नाव न घेता गंभीर आरोप केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी