Omraje Nimbalkar । अजान सुरू झाल्यावर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थांबविले भाषण, होतंय सर्वत्र कौतुक 

औरंगाबाद
Updated Dec 07, 2022 | 13:46 IST

महाप्रबोधन यात्रा सध्या मराठवाड्यात आहे, पण या यात्रेत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या कृतीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. (Shiv Sena MP Omraj Nimbalkar stopped his speech after the Azan started, there was appreciation everywhere)

थोडं पण कामाचं
  • महाप्रबोधन यात्रा सध्या मराठवाड्यात आहे, पण या यात्रेत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या कृतीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्त्वाखाली महाप्रबोधन यात्रा काल उस्मानाबाद जिल्ह्यात होती.
  • त्या यात्रेत शिवसेनेचे उद्धव गटातील खासदार ओमराजे निंबाळकर भाषण करत होते.

उस्मानाबाद :  महाप्रबोधन यात्रा सध्या मराठवाड्यात आहे, पण या यात्रेत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या कृतीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.  तर विरोधक या कृतीवर टीकाही करत आहेत.  (Shiv Sena MP Omraj Nimbalkar stopped his speech after the Azan started, there was appreciation everywhere)

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्त्वाखाली महाप्रबोधन यात्रा काल उस्मानाबाद जिल्ह्यात होती. त्या यात्रेत शिवसेनेचे उद्धव गटातील खासदार ओमराजे निंबाळकर भाषण करत होते. यावेळी ते राज्यपाल आणि भाजप नेत्यांवर आगपाखड करत होते. भाषण ऐन रंगात आले असताना अचानक अजान सुरू झाली. शिवसेना खासदार ओमराजेंच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ आपले भाषण थांबविले. अजान होऊ दिली आणि मग भाषणाला सुरूवात केली. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.  शिवसेनेचे हिंदूत्व हे दुसऱ्या धर्माचाही सन्मान करणे आहे अशा प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी