Neelam Gorhe : भाजपने किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांना रोजगार मिळवून दिला - नीलम गोऱ्हे  

औरंगाबाद
Updated Oct 01, 2022 | 16:21 IST

Neelam Gorhe : भाजपने किरीट सोमय्या आणि नवणीत राणा यांना रोजगार मिळवून दिला आहे अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे झाली, त्याचा लोकांना विसर पडण्यासाठी अशा प्रकारे षडयंत्र रचली जात आहेत असेही गोर्‍हे म्हणाल्या.

थोडं पण कामाचं
  • भाजपने किरीट सोमय्या आणि नवणीत राणा यांना रोजगार मिळवून दिला आहे
  • अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे.
  • तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे झाली, त्याचा लोकांना विसर पडण्यासाठी अशा प्रकारे षडयंत्र रचली जात आहेत असेही गोर्‍हे म्हणाल्या.

Neelam Gorhe : बीड : भाजपने किरीट सोमय्या आणि नवणीत राणा यांना रोजगार मिळवून दिला आहे अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी केली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे झाली, त्याचा लोकांना विसर पडण्यासाठी अशा प्रकारे षडयंत्र रचली जात आहेत असेही गोर्‍हे म्हणाल्या. (shivsena leader neelam gorhe criticized bjp over kirit somaiya and navneet rana)

अधिक वाचा : Auto Rickshaw and Taxi Fare Hike : मुंबईत आजपासून रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार; जाणून नवे दर

गोर्‍हे सध्या बीड दौर्‍यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गोर्‍हे म्हणाल्या की, प्रत्येक राजकीय पक्ष आपला मतदारवर्ग राखण्यासाठी काही कार्यक्रमाचे आयोजन करतं, त्यांना जे काम करावे ते त्यांनी करावा. परंतु भाजपने दोन लोकांना रोजगार दिला आहे, त्यात किरीट सोमय्या आणि नवणीत राणांचा समावेश आहे. महाविकास आघाडीने जे काही काम केले त्या कामांना स्थगिती देण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे. केंद्र सरकारने खासदार निधी काढून घेतला आणि राज्यात वापरला त्यावर आम्हीच कसा विकासनिधी खर्च केला हे सांगितले जात आहे. महाविकास आघाडी सरकारने आमदार निधी 2 कोटींवरून 4 कोटी केला होता, तसेच कोविडसाठीही वेगळा निधी देण्यात आला होता. कोविड काळात उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी खुप चांगले काम केले, परंतु जनतेने ही कामे विसरून जावीत म्हणून भाजपकडून हे षडयंत्र रचले गेले आहे असा आरोपही गोर्‍हे यांनी केला आहे.  

अधिक वाचा :  Pankaja Munde : नवरात्रौत्सवात पंकजा मुंडे 'झिंग झिंग झिंगाट'वर थिरकल्या; डान्सचा Video व्हायरल

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर गोर्‍हे म्हणाल्या की, पंकजा मुंडे यांना गेली अनेक वर्षे मी ओळख आहे, त्या लोकनेत्या आहेत. त्यांनी जे काही वक्तव्य केले आहे त्या काय विचार करून बोलल्या याची मला कल्पना नाही. त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी, एवढीच त्यांना शुभेच्छा. शिवसेनेत त्यांचे काही जण स्वागत करत आहेत, परंतु यावर मी काही भाष्य करू शकत नाही. पंकजा मुंडे या कधीही उद्धव ठाकरेंना भेटू शकतात, परंतु याचा यावर सध्या राजकीय वक्तव्य मी करणं योग्य ठरणार नाही असेही गोर्‍हे म्हणाल्या. 
 

अधिक वाचा :  ShivSena : 'एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान..”, शिंदेंनंतर आता ठाकरेंच्याही दसरा मेळाव्याचा टीझर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी