उस्मानाबाद जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा 'एवढा' साठा शिल्लक, FDA अधिकाऱ्यांनी दिली माहिती

औरंगाबाद
Updated Apr 08, 2021 | 20:07 IST

stocks of remedesivir injection in Osmanabad district : उस्मानाबाद जिल्ह्यात (osmanabad district) खासगी रुग्णालयात व मेडिकल दुकानात रेमडीसीवीर इंजेक्शनचा (remdisevir injection) तुटवडा

थोडं पण कामाचं

  • जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी महत्वपुर्ण लेखी आदेश जारी केले
  • राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ७ कंपन्यांना लेखी पत्र देऊन इंजेक्शन पुरवठा करण्याचे आदेश दिले
  • बार्शीत रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात (osmanabad district) खासगी रुग्णालयात व मेडिकल दुकानात रेमडीसीवीर इंजेक्शनचा (remdisevir injection) तुटवडा असून रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालयातील इंजेक्शन खासगी रुग्णालयात दिले जात आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात जवळपास ९५० इंजेक्शन साठा उपलब्ध आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात खासगी रुग्णालयात काल काही इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला होता मात्र तो अवघ्या काही तासात संपला आहे. आज जवळपास १ हजार पेक्षा जास्त साठा मिळणे अपेक्षित आहे तर जिल्हा रूग्णालयाने ३ हजार ५०० इंजेक्शनची मागणी केली असून २ दिवसात तो साठा मिळेल असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे विलास दुसाणे यांनी सांगितले त्याच बरोबर काळाबाजारी रोखण्यासाठी इंजेक्शन साठ्याचे ऑडिट करणार असून यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लेखी आदेश जारी केले

कोरोना संसर्गात उपचारासाठी महत्वाचे मानल्या जाणाऱ्या रेमडीसेविर इंजेक्शनसह अन्य औषधांच्या वापराबाबत व ती तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लेखी आदेश जारी केले आहेत. सद्यस्थितीत रेमडीसीवीर या औषधांचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील रेमडीसीवीरचा पुरवठा खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गरजेनुसार सुरू आहे. रुग्ण उपचार घेत असलेले रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत येत असल्यास जिल्हा रुग्णालयातून मोफत इंजेक्शन देण्यात येईल तर खासगी रुग्णालय त्या योजनेत येत नसल्यास जिल्हा रुग्णालयातून  उसनवारी तत्वावर ३ दिवसासाठी देण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी देखील सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ७ कंपन्यांना लेखी पत्र देऊन इंजेक्शन पुरवठा करण्याचे आदेश दिले

१० एप्रिल ते ३० एप्रिल व नंतर कशा स्वरूपात इंजेक्शन पुरवठा करायचा याचा प्लॅन आयुक्तांनी दिला आहे त्यानुसार राज्यात १० एप्रिल ते २९ एप्रिल या दरम्यान ३६ लाख ४० हजार रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असून यामुळे रूग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. राज्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा असून तो कमी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ७ कंपन्यांना लेखी पत्र देऊन इंजेक्शन पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. 

बार्शीत रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार

 कोरोनाच्या (corona) संकटात देखील रुग्णांना लुटण्याची वृत्ती पहायला मिळत आहे. एकीकडे रेमडीसिवीर इंजेक्शनची वाढती मागणी लक्षात घेऊन इंजेक्शनच्या काळाबाजाराचा भांडाफोड सोलापूर जिल्ह्यातील (solapur district) बार्शी (barshi) येथे झाला आहे. बार्शी शहरातील तुळशीराम रोडवर असलेल्या शहा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये रेमडीसिवीर या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा दावा बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होलसेल औषध विक्रेते राजन ठक्कर यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी