तुळजापूर मंदिर उद्यापासून भाविकांसाठी बंद, भाविकांनी न येण्याचे मंदिर प्रशासनाचे आवाहन

औरंगाबाद
Updated Apr 05, 2021 | 17:30 IST

Tuljapur temple closed for devotees from tomorrow : मंदिर खुले मात्र, भाविकांना प्रवेश दिला न गेल्याने आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयाबाबत पुजारी व व्यापाऱ्यात नाराजीचा सुर आहे

थोडं पण कामाचं

  • मंदिर खुले मात्र भाविक न आल्याने आर्थिक चक्र पुन्हा बिघडणार आहे
  • ब्रेक द चेन असतानाही अनेक भाविकांचा विनामास्क वावर पहायला मिळत आहे.
  • शासनाने दिलेल्या नियमाचे पुजारी पालन करीत आहेत

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचे (corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना पहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन (lockdown) करण्यात आले आहे. दरम्यान, काल कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thakre) यांनी ब्रेक द चेन अभियान जाहीर केले आहे. त्यानुसार तुळजाभवानी मंदिर खुले राहणार आहे मात्र भाविकांना दर्शनासाठी उद्यापासून मंदिरात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. तुळजाभवानी देवीच्या (tuljabhavani temple) पूजा या देवीचे महंत करतील मात्र भाविकांना मंदिरात प्रवेश नसणार आहे. भाविकांनी न येण्याचे मंदीर प्रशासनाचे आवाहन केले असून ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा.

मंदिर खुले मात्र भाविक न आल्याने आर्थिक चक्र पुन्हा बिघडणार आहे

दरम्यान, मंदिर खुले मात्र, भाविकांना प्रवेश दिला न गेल्याने आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयाबाबत पुजारी व व्यापाऱ्यात नाराजीचा सुर आहे. मंदिर खुले मात्र भाविक न आल्याने आर्थिक चक्र पुन्हा बिघडणार असल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे.

ब्रेक द चेन असतानाही अनेक भाविकांचा विनामास्क वावर पहायला मिळत आहे.

सोमवारी तुळजाभवानी मंदिरात अनेक भाविक व्यापारी हे सर्रास विनामस्क फिरताना आढळून आले आहेत.  मंदिरात अनेक कर्मचारी व पुजारी यांचे लसीकरण बाकी असून मंदिरात भाविक न आल्याने तुळजापूर येथील अर्थचक्र बिघडणार आहे. मागेही मंदिर बंद असल्याने पुजारी व व्यापारी आर्थिक संकटात होते त्यामुळे सरकारने पुजारी यांना मदत करावी अशी मागणी केली आहे.

शासनाने दिलेल्या नियमाचे पुजारी पालन करीत आहेत

दरम्यान, पुजारी यांचे मत जाणून घातल्यानंतर ते म्हणाले की, सध्या तुळजापूर शहरातील कोरोनाची परस्थिती ही कमी प्रमाणात आहे. टेस्ट देखील होत आहेत. त्याचंबरोबर लसीकरण देखील होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शासनाने दिलेल्या नियामांचे पुजारी पूर्णपणे पालन करीत आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना आम्ही मास्क वापरा, अंतर ठेवा, तसेच सनिटायझर वापरा असं सांगत आहोत. गर्दीमध्ये जाऊ नका, गर्दी करू नका असं देखील सांगत आहोत.

मंदिर बंद होत असेल तर पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार

पुढे बोलताना पुजाऱ्यांनी म्हटलं आहे की, उद्यापासून भाविकाना बंदी असेल तर पुजाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. मागच्या ८ ते ९ महिन्यांपासून पुजारी वर्ग घरात बसून होता. २ महिन्यापासून त्यांच्या उपजीविकेचे साधन सुरु झाले होते. मात्र, मंदिर बंद होणार असेल तर, पुजारी आणि लहान व्यापाऱ्यांची परस्थिती पुन्हा एकादा बिकट होणार असल्याचे पुजाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी