LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 3 July 2022 Maharashtra Assembly Special Session LIVE Updates : विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

Breaking News 3 July 2022 Maharashtra Assembly Special Session
फोटो सौजन्य:  Times Now
Breaking News 3 July 2022 Maharashtra Assembly Special Session

काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष दररोज नवनवी वळणे घेताना दिसत आहे. शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांचे सरकार आज विधासभेत पहिल्या अग्निपरीक्षेला सामोरे जाणार आहे. रविवारी आणि सोमवार अशा दोन दिवसांसासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल.

Jul 03, 2022  |  12:37 PM (IST)
अजित पवारांकडून नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन

राहुल नार्वेकरांकडून सभागृहाचं काम प्रभाविपणे होईल, सर्वांना न्याय मिळेल महाराष्ट्राच्या विकासाची चाकं गतिमान होतील अशी सभागृहाची आणि राज्यातील जनतेची अपेक्षा, असल्याचं अजित पवार म्हणाले. 

Jul 03, 2022  |  11:15 AM (IST)
थोड्याच वेळात होणार अध्यक्षाची निवड, केलं जाणार मतदान

विधानसभा अधिवेशनाच्या अध्यक्षांची निवड थोड्याच वेळात केली जाणार आहे. अध्यक्षांची निवड ही मतदानाद्वारे केली जाणार आहे. यासाठी सभागृहाचे दारे बंद करण्यात आली आहेत. 

Jul 03, 2022  |  11:11 AM (IST)
Maharashtra Assembly Special Session LIVE Updates: पटोलेंमुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला - फडणवीस

जयंत पाटलांनी राज्यपालांचे आभार मानले, मी नाना पटोलेंचे मानतो, त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला, मित्राच्या कर्तव्याला ते जागले म्हणून त्यांचे आभार, फडणवीसांची जोरदार टोलेबाजी

Jul 03, 2022  |  11:00 AM (IST)
थोड्याच वेळात सुरूवात होणार विधानसभेच्या विशेष अधिवेशन

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

Jul 03, 2022  |  10:59 AM (IST)
सूनील प्रभूंचा व्हिप अधिकृत आहे - आदित्य ठाकरे

शिवसेनेचा व्हिप महत्त्वाचा आहे, सूनील प्रभूंचा व्हिप अधिकृत आहे - आदित्य ठाकरे

Jul 03, 2022  |  10:48 AM (IST)
Assembly Speaker Election : शिवसेनेची मोठी खेळी, शिंदे गट विधानभवनात पोहोचण्याआधीच कार्यालयाचे 'दार' केले बंद

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार पाडले. या बंडखोरी नाट्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे विधानभवनातील कार्यालय बंद करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या मतभेदांमध्ये हे कार्यालय बंद करण्यात आलं आहे. ती कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Jul 03, 2022  |  10:47 AM (IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन

शिंदे गटाचे आमदार विधानभवनाकडे रवाना, विधानभवनात जाण्यापूर्वी बाळासाहेबांना अभिवादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन

Jul 03, 2022  |  10:47 AM (IST)
आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत झोकून काम करु - संजय राऊत

तुमचं राज्य कसं आलं हे देशाने पाहिलंय, आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत झोकून काम करु, आजच्यापेक्षा जास्त ताकदीने गरुडझेप घेऊ

Jul 03, 2022  |  10:46 AM (IST)
सर्व आमदार भगवे फेटे घालून विधिमंडळाकडे रवाना 

चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात पहिली बस रवाना 
बसमध्ये शिवसेना, भाजप आमदारांचा समावेश