LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Breaking News 04 July 2022 Latest Update: राज्यात पेट्रोल डिझेल लवकरच स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच घेणार निर्णय

Daily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीवर दिवसभरातील Daily News Update मधून नव्या घडामोडी जाणून घेऊ शकता.

विधानसभेत  शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी, आज बहुमत चाचणी
फोटो सौजन्य:  Times Now
विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी, आज बहुमत चाचणी

 आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे. 

Jul 04, 2022  |  04:17 PM (IST)
सर्वसामान्यांमधला मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल

राज्यात पेट्रोल डिझेल लवकरच स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच घेणार निर्णय

सर्वसामान्यांमधला मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चहावाला म्हणून हिणवण्यात आले होते, ते लोक कुठे आहेत?

भाजपला कमी पैसे देत होतो. माझ्यावर वॉच होता. आता नगरविकास खात्यातील भाजपा बॅकलॉग भरून काढू

अमित शहा म्हटले की आम्ही तुमच्यामागे चट्टाण की तरह खडे हुए है. 

सर्वात मोठे कलाकार हे आहेत. आम्ही कधी भेटायचो हे आमच्या लोकांना माहिती नाही.  ते झोपायचे आणि उठायच्या आत मी परत यायचो. 

हे सरकार टपरीवाल्यासाठी, भाजीवाल्यासाठी आहे, हे सरकार सर्वांचे सरकार आहे.

Jul 04, 2022  |  04:12 PM (IST)
शिवसैनिक मनाने माझ्यासोबत आहे. - एकनाथ शिंदे

शिवसैनिक मनाने माझ्यासोबत आहे. 

इथून फ्री झाल्यावर बाकीचं बघतो 

शिवसेनेला काय मिळालं. सत्तेतील फायदा शिवसैनिकांना मिळालं पाहिजे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तर कधी फायदा मिळणार 

हे बाळासाहेबांचे सरकार आहे. संपूर्ण मदत करण्यासाठी 

आम्ही शस्त्र बाहेर काढले नाहीत. एक मर्यादापेक्षा जास्त टॉलरेट केले जात नाही. 

मी मुख्यमंत्री झालो की मला अजून समजत नाही. 

50 लोकचं मुख्यमंत्री आहेत.  

तपासून सादर करा यात खूप वेळ जातो. सिस्टीम बदलली पाहीजे. 

जलसंपदाचे काही अडकलेले 

अजितदादा तुम्ही 40 वर्षांचे कट्टर शिवसैनिक आहात असे बोलत होतो. 

आपण दोस्त आहोत.

भाजपला कमी पैसे देत होतो. माझ्यावर वॉच होता.

Jul 04, 2022  |  03:55 PM (IST)
हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या पक्षासोबत आम्ही गेलो. आता १६५ नव्हे तर मिळून २०० जण निवडून आणू - एकनाथ शिंदे

बंडखोर आमदारांच्या डोक्यावर बंदुक लावून आणले नव्हते - एकनाथ शिंदे

हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍या पक्षासोबत आम्ही गेलो. आता १६५ नव्हे तर मिळून २०० जण निवडून आणू - एकनाथ शिंदे

Jul 04, 2022  |  03:50 PM (IST)
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाला विरोध केला - एकनाथ शिंदे

आम्ही इतर धर्मियांचाही अनादर करणार नाही, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. - एकनाथ शिंदे
भाजपडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदही मिळणार होते - एकनाथ शिंदे

कामाख्या देवीने कुणाचा बळी घेतला सांगा ?
४० रेडे पाठवले अशी टीका केली, कामाख्या देवी म्हणाली बोलणारा रेडा नको - एकनाथ शिंदे 

अजित पवार दादांनी नगरव विकास खात्याचा समांतर मंत्री निर्माण केला, तरी मी विरोध केला नाही. मी कद्रू स्वभावाचा नाही - एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरे यांना ६ वर्षे मतदानावर बंदी घातली, तेव्हा काँग्रेसने तक्रार केली होती.

सुरूवातीला मला मुख्यमंत्री करणार होते, परंतु अजित पवार आणि इतर नेत्यांनी माझ्या नावाला विरोध केला. 

आम्ही पाच वेळेला भाजपसोबत युती करण्याची गळ घातली, केसरकर याचे साक्षीदार आहेत - एकनाथ शिंदे

आम्ही आजही शिवसैनिक आहोत, उद्याही शिवसैनिक आहोत आणि उद्याशी शिवसैनिक राहणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jul 04, 2022  |  03:32 PM (IST)
आम्ही ठाण्यात लेडीज बार तोडले, १०० हून अधिक गुन्हे माझ्यावर दाखल झाले. - एकनाथ शिंदे

अजित दादा तुम्ही विरोधी पक्षात असले तरी आमचेच आहात - एकनाथ शिंदे

फडणवीस यांचे अभिनंदन त्यांनी मला समृद्धी महामार्गासाठी काम करण्याची संधी दिली.

महाविकास आघाडीत मला त्रास देण्यात आला होता.

आज ठाण्यासह पालघरमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत.

आनंद दिघे साहबे यांच्या मृत्यूमुळे आम्ही कोलमडून गेलो होतो.

आनंद दिघे यांचे पार्थिव पोलिसांच्या गाडीत टाकून न्यावे लागले होते.

आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यातील शिवसेना संपेल असे लोकांना वाटत होते.

आम्ही ठाण्यात लेडीज बार तोडले, १०० हून अधिक गुन्हे माझ्यावर दाखल झाले. - एकनाथ शिंदे

आम्ही आंदोलनं केले, शिवसेना वाढवली, जीवनावश्यक वस्तू, विजेसाठी आंदोलने केली. 

Jul 04, 2022  |  03:23 PM (IST)
एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर, दोन मुलांच्या मृत्यूच्या आठवणीमुळे शिंदे गहिवरले.

कुटुंबीयांना वेळ नाही दिला परंतु शिवसेनेला मी पूर्ण वेळ दिला, शिवसेना हेच माझे कुटुंब - एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर, दोन मुलांच्या मृत्यूच्या आठवणीमुळे गहिवरले.

https://fb.watch/e2ps7V0zAF/

Jul 04, 2022  |  03:18 PM (IST)
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत अपमानास्पद वागणूक - एकनाथ शिंदे

शिवसेनेसाठी शहीद होईन
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत अपमानास्पद वागणूक - एकनाथ शिंदे
 

Jul 04, 2022  |  02:20 PM (IST)
उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल

उद्धव ठाकरे जिल्हाध्यक्षांच्या बैठकीसाठी शिवसेना भवनात दाखल

सेना भवनात होणार महत्वपूर्ण बैठक 

Jul 04, 2022  |  12:39 PM (IST)
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात उत्साह नव्हता - अजित पवार

आमदार निधी एक कोटी वरून ५ कोटी पर्यंत वाढवला. निधी वाटपात कुठलाही भेदभाव केला नाही - पवार

ज्यांचे ११० आमदार आहेत त्यांचा मुख्यमंत्री नाही आणि ज्यांचे ४० आमदार आहेत त्यांचा नेता मुख्यमंत्री यात काहीतरी काळेबेरे आहे अशी चर्चा होणार.

मंत्रिमंडळ जाहीर होईपर्यंत अब्दुल सत्तार आणि इतर नेत्यांनी मौन बाळगले आहे - पवार

कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही - अजित पवार
बंड करणार्‍या आमदारांना शिवसैनिकांनी निवडून आणले नाही.
बंड करणार्‍या नेत्यांना शिवसैनिकांनी नाकारले. 

कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही - अजित पवार

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात उत्साह नव्हता - अजित पवार

गेल्या अडीच वर्षात फडणवीस मुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले आणि उपमुख्यमंत्रीही झाले, सर्व पदं त्यांनी मिळवली - अजित पवार

Jul 04, 2022  |  12:19 PM (IST)
संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार - फडणवीस

संभाजीनगर, धाराशिव नामांतराचा निर्णय पुन्हा कॅबिनेटमध्ये घेणार आणि अंमलबजावणी करणार - फडणवीस

Jul 04, 2022  |  12:17 PM (IST)
सत्ता येते जाते, सत्तेचा अहंकार डोक्यात जाता कामा नये - फडणवीस

सत्ता येते जाते, सत्तेचा अहंकार डोक्यात जाता कामा नये
एक शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. 
एकनाथ शिंदे हे फक्त मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात उपलब्ध असेल.

Jul 04, 2022  |  12:11 PM (IST)
एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मी संपूर्ण ताकदनिशी उभा आहे - फडणवीस

हे सरकार ईडीमुळेच आले आहे - देवेंद्र फडणवीस
 हे सरकार ईडीमुळेच आले आहे, एकनाथ आणि देवेंद्र - फडणवीस

एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मी संपूर्ण ताकदनिशी उभा आहे.
मला पक्षाने सांगितलं असतं घरी बस तर तोही निर्णय मी मान्य केला असता.
एकनाथ शिंदे यांच्यात आणि माझ्यात कधीही दुरावा निर्माण होणार नाही.

Jul 04, 2022  |  12:06 PM (IST)
मी पुन्हा आलो आणि एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो - देवेंद्र फडणवीस

मी पुन्हा आलो आणि एकनाथ शिंदे यांना घेऊन आलो - देवेंद्र फडणवीस
ज्यांनी माझी टिंगल टवाळी केली त्यांचा मी बदला घेणार,
बदला घेणार म्हणजे मी त्यांना माफ करणार

Jul 04, 2022  |  12:04 PM (IST)
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा प्रभाव- फडणवीस

शिंदे यांचा राजकीय प्रवास हा शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा.
परिस्थितीमुळे त्यांना फक्त दहावी पर्यंत शिक्षण घेता आले. नंतर जेव्हा मिळाला तेव्हा ७७ टक्क्यांनी ते पदवी मिळवली.

एकनाथ शिंदे यांनी कायम जनतेची कामे केली.
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा प्रभाव- फडणवीस

समृद्धी महामार्ग होण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा 
शिंदे यांनी जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली.

एकनाथ शिंदे यांच्यात माणूसकी
सीमालढ्यात एकनाथ शिंदे यांचा सहभाग
राज्यात पूरपरिस्थिती असताना शिंदे यांनी उत्तम काम केले.
एकनाथ शिंदे २४ तास काम करतात, शिंदे यांच्यासोबत मी सुद्धा २४ तास काम करणार.

Jul 04, 2022  |  11:51 AM (IST)
बहुमत चाचणी जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मानले आभार

बहुमत चाचणी जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मानले आभार
शिंदे-फडणवीस सरकारने १६४ मतांनी बहुमत चाचणी जिंकली.
ज्यांनी अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत केली त्यांचेही आभार - फडणवीस

Jul 04, 2022  |  11:48 AM (IST)
Maharashtra Assembly Session Updates : शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत प्रस्ताव जिंकला

विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६४ मते; शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत प्रस्ताव जिंकला

Jul 04, 2022  |  11:34 AM (IST)
यामिनी जाधव यांचा अनुक्रमांक येताच आज पुन्हा ईडी ईडी घोषणा

यामिनी जाधव यांचा अनुक्रमांक येताच आज पुन्हा ईडी ईडी घोषणा, पण आज यामिनी जाधव यांनी हात जोडत सर्वांना उत्तर दिलं. कालही अशीच घोषणाबाजी झाली तेव्हा यामिनी जाधव यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.

Jul 04, 2022  |  10:47 AM (IST)
महाराष्ट्रातील जनता आनंदी -दरेकर

शिंदे-फडणवीस सरकार आल्याने महाराष्ट्रातील जनता आनंदी झाली आहे. आज आश्चर्यकारक बहुमत शिंदे-फडणवीस सरकारला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

Jul 04, 2022  |  10:45 AM (IST)
आमदार संतोष बांगरही एकनाथ शिंदेंच्या गटात

आमदार संतोष बांगरही एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत, शिवसेनेला आणखी एक धक्का

Jul 04, 2022  |  10:07 AM (IST)
Maharashtra Politics :  शिंदे-फडणवीस सरकारसाठी आज कसोटीचा दिवस, विधानसभेत आज बहुमत चाचणी

आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु होणार आहे.