LIVE BLOG
More UpdatesMore Updates

Mharashtra vidhan parishad election 2022: मविआ पाच आणि भाजपचे पाच उमेदवार विजयी, प्रसाद लाड, भाई जगताप विजयी, चंद्रकांत हंडोरे पराभूत

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2022
फोटो सौजन्य:  Times Now
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2022

Maharashtra vidhan parishad election 2022: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांसाठी आज निवडणूक होत आहे. भाजपनं या निवडणुकीत ५ जणांना उमेदवारी दिली आहे. प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रसाद लाड विधानपरिषद निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत.

Jun 20, 2022  |  11:18 PM (IST)
विधान परिषद निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची उद्या बैठक

विधान परिषद निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची उद्या बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

Jun 20, 2022  |  11:09 PM (IST)
संजय निरूपम यांचा काँग्रेसला घरचा आहेर
Jun 20, 2022  |  10:48 PM (IST)
चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव

विधान परिषदेच्या अत्यंत उत्कंठावर्धक निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.  भाजपकडून राम शिंदे (३०), श्रीकांत भारतीय (३०), प्रविण दरेकर (२९) प्रसाद लाड (२८) आणि उमा खापरे (२७) मते मिळवून विजयी झाले. तर शिवसेनेचे आमशा पडवी (२६) आणि सचिन अहिर (२६) मते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर (२८) आणि एकनाथ खडसे (२९) काँग्रेसकडून भाई जगताप (२६) मते मिळवून विजयी झाले. चंद्रकात हंडोरे यांना २२ मते मिळाली. त्यामुळे ते पराभूत झाले. 

Jun 20, 2022  |  10:06 PM (IST)
भाजपने खूप छळ केला- एकनाथ खडसे

भाजपने खूप छळ केला. मला रोखण्याचा अतोनात प्रयत्न केला. मला बेघर करण्याचा प्रयत्न - एकनाथ खडसे 

Jun 20, 2022  |  10:04 PM (IST)
अतिरिक्त मिळालेली मते भाजपच्या मित्रांनी केली - एकनाथ खडसे

अतिरिक्त मिळालेली मते भाजपच्या मित्रांनी केली - एकनाथ खडसे

Jun 20, 2022  |  09:40 PM (IST)
MUMBAI |देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आमदारांचा जल्लोष
Jun 20, 2022  |  09:49 PM (IST)
नव्या आणि दहाव्या जागेसाठी चुरस

काँग्रेसच्या भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे, आणि प्रसाद लाड यांच्यात लढत 

Jun 20, 2022  |  09:50 PM (IST)
चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप आणि प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची किती मते

चंद्रकांत हंडोरे यांना २२, भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मते तर प्रसाद लाड यांना १७ मते पडली आहेत. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून आहे. 

Jun 20, 2022  |  09:25 PM (IST)
विजयी उमेदवारांची यादी

राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रविण दरेकर, एकनाथ खडसे, आमशा पाडवी, सचिन आहिर, रामराजे निंबाळकर, चंद्रकांत हंडोरे विजयी

Jun 20, 2022  |  09:14 PM (IST)
भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात काटें की टक्कर

भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात काटें की टक्कर, भाजप भाई जगताप यांना १५ मते तर प्रसाद लाड यांना १२ मते पडली आहे.

Jun 20, 2022  |  09:12 PM (IST)
एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांचा विजय

एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांचा विजय 

Jun 20, 2022  |  09:10 PM (IST)
आक्षेप घेतलेली दोन मते बाजुला ठेऊन मतमोजणी सुरू

आक्षेप घेतलेली दोन मते बाजुला ठेऊन मतमोजणी सुरू, रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांच्या मतावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. 

Jun 20, 2022  |  08:52 PM (IST)
रामराजेंचे मत बाद करण्यावर राष्ट्रवादीचा आक्षेप

रामराजेंचे मत बाद करण्यावर राष्ट्रवादीचा आक्षेप घेतला आहे. याविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली जाणार आहे. 

Jun 20, 2022  |  08:49 PM (IST)
उमा खापरेंना मिळालेले मत चुकीच्या पद्धतीने बाद केल्याचा भाजपचा दावा

उमा खापरेंना मिळालेले मत चुकीच्या पद्धतीने बाद केल्याचा भाजपचा दावा, या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. 

Jun 20, 2022  |  08:45 PM (IST)
पहिल्या पसंतीसाठी दोन मते बाद झाल्याने कोटा बदलला

विधान परिषदेच्या १० जागांसाठी सुरू असलेल्या मतदानात २८५ पैकी २ मते बाद ठरल्याने २८३ मते वैध ठरली आहे. त्यामुळे विजयी उमेदवाराला २५.७३ मते लागणार आहेत. 

Jun 20, 2022  |  08:37 PM (IST)
दोन मते बाद झाली, एक भाजप तर एक मविआचे मत, २८३ मते वैध

दोन मते बाद झाली, एक भाजप तर एक मविआचे मत, उमा खापरे यांना पडलेले पहिले मत आणि रामराजे यांना पडलेली पहिले मत बाद 

Jun 20, 2022  |  08:29 PM (IST)
उमा खापरेंच्या पहिल्या पसंतीच्या मतावर मविआचा आक्षेप

उमा खापरेंच्या पहिल्या पसंतीच्या मतावर मविआचा आक्षेप,  भाजपने यापूर्वी तिसऱ्या पसंतीच्या मतावर आक्षेप घेतला होता. 

Jun 20, 2022  |  08:26 PM (IST)
शेवटच्या २५ मतपत्रिकांची छाननी सुरू

शेवटच्या २५ मतपत्रिकांची छाननी सुरू, तिसऱ्या पसंतीच्या मताबद्दल आक्षेप, ते मत बाद 

Jun 20, 2022  |  08:15 PM (IST)
खडाजंगी झालेले मत बाजूला ठेवलं - सूत्र

खडाजंगी झालेले मत बाजूला ठेवलं आहे, भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या मतावर आक्षेप घेतला होता. या मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांना देण्यात आले होते. त्यानंतर तिसऱ्या पसंतीसाठी मत देताना ओव्हर रायटिंग झाल्यामुळे आक्षेप घेतला आहे. 

Jun 20, 2022  |  08:02 PM (IST)
भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी सुरू

मत बाद करण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी सुरू