Pune Kasba Peth, Pimpri-Chinchwad By Election Result 2023: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया पार पडल्यावर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या मतमोजणीकडे. तसेच आजच त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. यामुळे या निकालांकडेही अनेकांचे लक्ष आहे.