Maharashtra MLC Election Result 2023 Live Update : महाराष्ट्रात नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. विधानपरिषदेच्या या पाच जागांवर कोण निवडून येणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. राज्यात विधानपरिषदेच्या नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या पाच मतदारसंघांसाठी सोमवार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान झाले. निवडणूक निकाल आज (गुरुवार 2 फेब्रुवारी 2023) जाहीर होणार आहे.