LIVE BLOG
More UpdatesMore Updates

३० जून २०२० च्या बातम्या: ताज्या बातम्या आणि मोठ्या घडामोडी 

मराठी ताज्या बातम्या, ३० जून २०२० आणि मोठ्या बातम्या: दिवसभरातील प्रत्येक ताजी बातमी आपल्याला इथे एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. वाचा ३० जून २०२० च्या मुख्य बातम्या.
गावगाडा
रोहित गोळे
Updated Jun 30, 2020 | 11:33 PM IST
मराठी ताज्या बातम्या, ३० जून २०२० आणि मोठ्या बातम्या: दिवसभरातील प्रत्येक ताजी बातमी आपल्याला इथे एक
फोटो सौजन्य:  Times Now
आजच्या ताज्या बातम्या

मुंबई: मराठी ताज्या बातम्या, ३० जून २०२० आणि मोठ्या बातम्या: देश आणि जगभरातील अशा काही प्रमुख बातम्यांवर एक नजर, अशा बातम्या ज्या सामान्यांशी निगडीत आहेत. या ठिकाणी वाचा ३० जूनच्या मुख्य बातम्या.

देशभरात मागील २४ तासात तब्बल ४१८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १८ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे दहावीचा निकाल नेमका कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे डोळे लागून राहिलं आहेत. याविषयी आता नवी माहिती समोर येत आहे.  याशिवाय दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला इथे पाहता येतील. जाणून घ्या आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्या

Jun 30, 2020  |  11:33 PM (IST)
मुंबईत उद्यापासून विशेष कर्मचाऱ्यांसाठी ३५० जादा लोकल
केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून माहिती दिली की, उद्या पासून मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जादाच्या ३५० लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात राज्य सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, आयकर कर्मचारी, जीएसटी कर्मचारी, कस्टम कर्मचारी, पोस्टल कर्मचारी, राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी, एमबीपीटी कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी, संरक्षण आणि राज भवनातील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा आहे. ही सुविधा सामान्य नागिरकांसाठी नाही आहे, असेही नमूद करण्यात आले.
Jun 30, 2020  |  09:26 PM (IST)
Video: सॅटेलाईट फोटोतून खरेपणा आला समोर, चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी मागे ढकलले

सॅटेलाईट फोटोतून खरेपणा आला समोर

 

Times Now वर सॅटेलाईटचे फोटो समोर आले आहेत. यात भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याला पिछाडले आहे. या फोटोतून चीनची संपूर्ण पोलखोल झाली आहे.

 अधिक वाचा 

Jun 30, 2020  |  09:24 PM (IST)
राज्यात एकूण कोरोना बाधित १ लाख ६६ हजारांच्या पुढे, आज २४५ जणांचा मृत्यू

राज्यात एकूण कोरोना बाधित १ लाख ६६ हजारांच्या पुढे

Covid-19 Maharashtra Report, 30 june 2020, मुंबई : राज्यात अनलॉक २ ला उद्या पासून सुरूवात होत असताना राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ६६ हजार ८९० झाली आहे.

अधिक वाचा

Jun 30, 2020  |  09:22 PM (IST)
ठाण्यात आणि मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा वाढवला लॉकडाऊन

ठाण्यात आणि मीरा-भाईंदरमध्ये पुन्हा वाढवला लॉकडाऊन

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं(Thane Municipal Corporation)  पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

 अधिक वाचा 

Jun 30, 2020  |  09:21 PM (IST)
नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

अजोय मेहता रिटायर, संजय कुमार नवे मुख्य सचिव

sanjay kumar new chief secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार (sanjiv Kumar) यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता (ajay mehta) यांच्याकडून आज पदभार स्वीकारला.

 अधिक वाचा 

Jun 30, 2020  |  09:20 PM (IST)
कोरोनिलवर पतंजलीचा यू टर्न

कोरोनिलवर पतंजलीचा यू टर्न

corona virus patanjali coronil: कोरोना व्हायरसवर औषध बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजलिने यू टर्न घेतला आहे. आचार्य बालकृष्णने या संबंधावर स्पष्टीकरण दिले आहे. उत्तराखंड आयुर्वेद विभागाने पतंजलिला नोटीस पाठवली होती

 अधिक वाचा 

Jun 30, 2020  |  07:55 PM (IST)
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३० जून २०२०

दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३० जून २०२०

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर

वाचा अधिक

Jun 30, 2020  |  07:16 PM (IST)
पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा चुकवले सगळ्यांचे अंदाज!

पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा चुकवले सगळ्यांचे अंदाज!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. पण यावेळी मोदींनी सर्वांचेच अंदाज चुकवले.

वाचा अधिक

 

Jun 30, 2020  |  07:15 PM (IST)
पडळकरांचं वक्तव्य चुकीचंच, भाजपला घरचा आहेर 

पडळकरांचं वक्तव्य चुकीचंच, भाजपला घरचा आहेर 

चुकीला चूक म्हणणं हे संस्कार आपल्याला दिल्यामुळे गोपीचंद पडळकरांचं यांचे पवार साहेबांबाबतचे  वक्तव्य हे चुकीचंच आहे अशी प्रतिक्रीया भाजपाचे नेते वैभव पिचड यांनी दिली आहे.

वाचा अधिक

 

Jun 30, 2020  |  07:14 PM (IST)
मोदींच्या भाषणावर बॉलिवूड सेलेब्सच्या 'खास'च प्रतिक्रिया

मोदींच्या भाषणावर बॉलिवूड सेलेब्सच्या 'खास'च प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला पुन्हा संबोधित केलं. यावरून बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी काही विशेष प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वाचा अधिक

Jun 30, 2020  |  07:13 PM (IST)
गोपीचंद पडळकर प्रकरणी पहिल्यांदा बोलले उदयनराजे!

गोपीचंद पडळकर प्रकरणी पहिल्यांदा बोलले उदयनराजे!

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा अधिक

 

Jun 30, 2020  |  07:12 PM (IST)
सोने चांदी आजचा भाव, ३० जून २०२०:  सोने झाले स्वस्त

सोने चांदी आजचा भाव, ३० जून २०२०:  सोने झाले स्वस्त

सोन्याचा बाजार खुला झाला तेव्हा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली नाही. गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे.

वाचा अधिक

 

Jun 30, 2020  |  07:10 PM (IST)
धक्कादायक... मामानेच केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार 

धक्कादायक... मामानेच केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार 

एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मामाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.  

वाचा अधिक

 

Jun 30, 2020  |  07:09 PM (IST)
भारतातल्या 5G प्रकल्पातून चिनी कंपनीची हकालपट्टी?

भारतातल्या 5G प्रकल्पातून चिनी कंपनीची हकालपट्टी?

भारतात 5G प्रकल्पांतून चीनच्या हुआवे (Huawei) कंपनीची कायमची हकालपट्टी होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. 

वाचा अधिक

 

Jun 30, 2020  |  07:07 PM (IST)
पंतप्रधान मोदी: PM मोदींनी केली केली अत्यंत मोठी घोषणा

पंतप्रधान मोदी: PM मोदींनी केली केली अत्यंत मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात कृषी क्षेत्राविषयी एक मोठी घोषणा केली आहे. 

वाचा अधिक

Jun 30, 2020  |  07:06 PM (IST)
पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ

पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केलं आहे. पाहा यावेळी पंतप्रधान मोदी नेमकं काय-काय म्हणाले.

वाचा अधिक
 

Jun 30, 2020  |  07:04 PM (IST)
धक्कादायक, २४ तासांत BSFच्या ५३ जवानांना कोरोना

धक्कादायक, २४ तासांत BSFच्या ५३ जवानांना कोरोना

भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये तणावाचे वातावरण असताना एका चिंताजनक बातमी समोर आली आहे. 

वाचा अधिक

Jun 30, 2020  |  07:03 PM (IST)
आमिर खानच्या घरी पोहोचला कोरोना

आमिर खानच्या घरी पोहोचला कोरोना,

कोरोना व्हायरस बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरापर्यंत पोहोचला आहे. त्याचे अनेक स्टाफ मेंबर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

वाचा अधिक

Jun 30, 2020  |  07:02 PM (IST)
संतांच्या पादुका पंढरपूरसाठी रवाना, मुख्यमंत्री करणार पूजा

संतांच्या पादुका पंढरपूरसाठी रवाना, मुख्यमंत्री करणार पूजा

वारकऱ्यांची साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित होऊ नये म्हणून सरकारने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत प्रमुख संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे.

वाचा अधिक

Jun 30, 2020  |  12:27 PM (IST)
मुंबईतील ताज हॉटेल उडवण्याची धमकी

मुंबईतील ताज हॉटेल उडवण्याची धमकी

कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानात मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एक कॉल आला. ताज हॉटेलला २६/११च्या हल्ल्याप्रमाणे उडवून देण्याची धमकी देण्यात आली. 

वाचा अधिक