जळगाव : राज्यसभेत (Rajysabh) शिवसेनेला (Shivsena) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मिळालेलं अपयश आणि भाजपला आलेल्या यशाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री (Union State Minister)रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पराजय झाल्यामुळे मुख्यमंत्री (Chief Minister) ) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सत्तेतून बाहेर पडावं आणि राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज मुक्ताईनगर येथे प्रसिद्ध गायक स्वर्गीय प्रतापसिंग बोदडे यांच्या अभिवादन सभेसाठी आले होते, यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आले होते. मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौकामध्ये स्वर्गीय गायक प्रतापसिंग बोदडे यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर भीम गीतांचा कार्यक्रम ही यावेळी घेण्यात आला. त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, राज्यसभेत शिवसेनेला झटका बसला आहे, 2024च्या निवडणुकीत त्यांना अजून मोठा झटका बसेल. कारण आम्ही भाजपसोबत आहोत.
लोकशाहीमध्ये एका मताला हे फार मोठं महत्व असतं, एका मताने अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार हरलं होतं, नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षांची मतं बीजेपीच्या पारड्यात पडलेली आहेत, यामुळे उद्धव ठाकरे यांना आता सत्तेवर राहण्याचा काही अधिकार नाही, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. तसेच सत्तेतून त्यांनी बाहेर पडले पाहिजे, अशी आमची त्यांना सूचना आहे. उद्धव ठाकरेंनी फार मोठी प्रतिष्ठा कमावली होती, परंतु या निवडणुकीमुळे त्यांची प्रतिष्ठा त्यांनी गमावली आहे, आणि महाविकास आघाडीचा पूर्ण देशांमध्ये मोठा अपमान झाला आहे,अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.