रोहिणी खडसेंवर झालेल्या हल्ल्यानंतर वडील एकनाथ खडसे चंद्रकांत पाटलांवर भडकले , प्रतिक्रिया देत म्हणाले.....

Ekanath khadase targeted shivasena mla chandrakant patil : रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं

ekanath khadase targeted shivasena mla chandrakant patil
रोहिणी खडसेंवर झालेल्या हल्ल्यानंतर नाथा भाऊ संतापले   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हा कसला शिवसेनेचा आमदार असा सवाल एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविषयी केला
  • रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर योग्य कारवाई करावी – एकनाथ खडसे
  • आदरणीय मुख्यमंत्री महोदय संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना? रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Ekanath khadase Reaction on Rohini Khadse Attack : जळगाव : रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्यावर जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलंच पेटणार असल्याचं दिसून येत आहे. कारण , रोहिणी खडसे यांच्या हल्ल्यानंतर एकनाथ खडसे यांनी थेट यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे जळगावमध्ये राष्ट्रावादी विरुद्ध शिवसेना असा वाद चिघळण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वी मी ऑडिओ क्लिप जारी केल्या. ते आणि हल्ला करणारे हे एकच असून गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. महिलांवरील अन्याय कदापि सहन करणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले. त्याचबरोबर रोहिणी खडसेंवर हल्ला झाला असला तरी मी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

हा कसला शिवसेनेचा आमदार असा सवाल एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविषयी केला

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जागेचा त्याग केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला आणि आता स्वत: ला शिवसैनिक म्हणून घेतो, असं एकनाथ खडसे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, महिलांवर हल्ला करणारे कोण, विनयभंग करणारे कोण? या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची चौकशी झाली पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले. हा कसला शिवसेनेचा आमदार असा सवाल एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविषयी केला आहे.

रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर योग्य कारवाई करावी – एकनाथ खडसे

रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं. चंद्रकांत पाटील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळं आमदार झाले. आता त्याच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. 

रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल?

दरम्यान, आपल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे यांनी देखील आता ट्विट करत एक प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटवरुन सवाल केला. त्या म्हणाल्या की, आदरणीय मुख्यमंत्री महोदय संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला आहे. त्यामुळे आगामी काळात हे जेष्ठ मंडळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी