माझ्यापुढे शेपटी हलवणारे ३० वर्षाचा हिशेब मागत आहेत, एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर जोरदार निशाणा

ekanath khadse targeted gulabarav patil : पक्षाचा आशीर्वाद असला तरी माझ्या शब्दाला मान होता आणि आता मेरी बिल्ली मेरे को म्याऊ. शेर शेर होता है, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.

ekanath khadse targeted gulabarav patil
माझ्यापुढे शेपटी हलवणारे ३० वर्षाचा हिशेब मागत आहेत - खडसे   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माझ्यापुढे शेपटी हलवणारे, मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात तीस वर्षात तुम्ही काय केलं? - एकनाथ खडसे
  • पारधीपासून ते धरणगाव रस्ता मी केला. जामनेर मतदारसंघात सर्व धरणाचे काम कोणी केलं? - खडसे
  • टपरीचालकास बाळासाहेब ठाकरे यांनी मला मंत्री केले होते खडसेंनी नाही - गुलाबराव पाटील

जळगाव : पक्षाचा आशीर्वाद असला तरी माझ्या शब्दाला मान होता आणि आता मेरी बिल्ली मेरे को म्याऊ. शेर शेर होता है, असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.  नाथाभाऊंच्या जीवावर मोठे झाले कोण कुठे होतं? माझ्यापुढे शेपटी हलवणारे, मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात तीस वर्षात तुम्ही काय केलं? टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. गुलाबराव तुमच्या तालुक्यात अंजली धरण मी बांधलं. तरी विचारता तीस वर्षात तुम्ही काय केलं? असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला. ते बोदवड नगरपंचायत प्रचार सभेत बोलत होते. पारधीपासून ते धरणगाव रस्ता मी केला. जामनेर मतदारसंघात सर्व धरणाचे काम कोणी केलं? असा सवालही खडसे यांनी विचारला आहे.

गुलाबराव पाटील यांनीही केला पलटवार

टपरीचालकास बाळासाहेब ठाकरे यांनी मला मंत्री केले होते यांनी नाही, असं एकनाथ खडसे यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचंबरोबर गुलाबराव पाटील यांनी म्हटले की,  तुम्ही काम केले असेल तर उपकार केले नाहीत. मंत्र्याचं कामच आहे काम करण्याचं. मीही तीस वर्षांपासून आमदार राहिलो आहे, त्याचा फंड माझ्याकडे भरपूर असल्याने मला कोणाकडे जाण्याची गरज नाही. राहिली गोष्ट मला मंत्री करण्याची तर टपरीचालकास बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्री केले होते, यांनी नाही. उलट यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्री केले होते, हे त्यांनी विसरू नये, असंही गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना उत्तर दिलं आहे. 

अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता – गिरीश महाजन 

नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो, अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता, असे म्हणत महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसेंवर जोरदार टिका केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी