महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेले एक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांचा उल्लेख करून केलेले वक्तव्य वादात सापडले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ते जळगाव येथे एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना गुलाबरावांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य गुलाबरावांनी केले. डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एक डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहोत, असेही वक्तव्य गुलाबरावांनी केले.
मंत्री झाल्यावर भरपूर पैसे मिळतात, मजा असते असे काही जण म्हणतात. पण तसे नाही असे म्हणत नंतर गुलाबरावांनी वादग्रस्त वक्तव्य केले.
याआधी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घोषणायुद्ध झाले होते. एकनाथ शिंदे यांना समर्थन करण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या ५० आमदारांना लक्ष्य करून विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. ५० खोके एकदम OK अशा स्वरुपाची घोषणा विरोधकांनी दिली. या घोषणेची माध्यमातून भरपूर चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर जळगावच्या कार्यक्रमात गुलाबरावांनी मंत्र्यांसमोर मोठे आणि गुंतागुंतीचे आव्हान असे सांगताना काही वक्तव्य केली. ही वक्तव्य आता वादात सापडली आहेत.