ऐकलं का! गुलाबराव पाटलांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखी केलीत

जळगाव
भरत जाधव
Updated Dec 19, 2021 | 15:47 IST

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्ष निवडणुकांसाठी मैदानात उतरले आहेत. जोरात निवडणुकीचा प्रचार केला जाऊ लागला असून नेते एकमेंकांच्या पक्षांवर टीका करत आहेत.

गुलाबराव पाटील
Gulabrao Patil   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलण्या एवढी उंची नाही - गुलाबराव पाटील
  • बोदवड नगरपंचायत प्रचार सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला.

जळगाव - राज्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्ष निवडणुकांसाठी मैदानात उतरले आहेत. जोरात निवडणुकीचा प्रचार केला जाऊ लागला असून नेते एकमेंकांच्या पक्षांवर टीका करत आहेत. अंतिम टप्प्यात पोहचलेल्या प्रचारात शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना बोदवड नगरपंचायत प्रचार सभेत खोचक टोला लगावला आहे. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. 

गुलाबराव पाटलांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'माझे आव्हान आहे 30 वर्ष राहिलेल्या आमदाराला. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पहावे की मी कसा विकास केला आहे. माझ्या धरणगावला या आणि तेथिल रस्ते पाहा. सर्व रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे केले आहेत. जर रस्ते तसे नसतील तर राजीनामा देऊन टाकेन.'

नितेश राणेंनाही लगावला टोला

गुलाबराव पाटील यांनी सभेदरम्यान नितेश राणे यांनाही टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला असे नितेश राणे म्हणाले होते. यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलण्या एवढी नितेश राणेंची उंची नाही. उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी नितेश राणेंच्या वडिलांना राजकारणात मोठे केले, यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंविषयी बोलूच नये.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी