जळगावांत गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी

जळगाव
भरत जाधव
Updated Aug 13, 2022 | 14:17 IST

मंत्रीपदाची (Minister) शपथ (oath) घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात (constituency) जात असलेल्या गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा (Jalgaon District) सज्ज झाला आहे. आज सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना झाले असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असणार आहेत.

Jalgaon ready to welcome Gulabrao Patil
गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी जळगावांत जंगी तयारी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असणार
  • मंत्री गुलाबराव पाटील म्हणून ते प्रथमच आपल्या मतदारसंघात प्रवेश करणार
  • या यात्रेत जागोजागी गुलाबराव पाटलांची तोफही धडाडणार आहे.

मुंबई:  मंत्रीपदाची (Minister) शपथ (oath) घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात (constituency) जात असलेल्या गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा (Jalgaon District) सज्ज झाला आहे. आज सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना झाले असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असणार आहेत. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात किमान पंधरा ठिकाणी पाटलांची मुलुख मैदानी तोफ धडाडणार आहे. त्यामुळे आज शक्तिप्रदर्शनरूपी स्वागतयात्रेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लागणार आहे. शिवसेनेतील कणखर नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आता ते शिंदे गटात सामील झाले असून ते आपल्या या यात्रेत काही गौप्यस्फोट करणार का, असा प्रश्न अनेकांना आहे. 

मंत्री गुलाबराव पाटील म्हणून ते प्रथमच आपल्या मतदारसंघात प्रवेश करीत असल्यामुळे आज शनिवारी त्यांच्या मतदारसंघातच नव्हे तर अवघ्या जळगाव जिह्यात त्यांचे जोरदार स्वागत करून शक्तिप्रदर्शन दाखविण्यासाठी त्यांचे समर्थक सज्ज झाले आहेत. मंत्री पाटील सकाळी मुंबईहून जळगावला निघाले असून ते दुपारी 2 पर्यंत अमळनेर गाठतील आणि तेथूनच त्यांची भव्य आणि दिव्य स्वागत यात्रा पूर्ण जिल्ह्यात निघेल.

Read Also : ५० रुपये लाचचा खटला थेट १६ वर्ष चालला, कॉन्स्टेबल निलंबित

अमळनेरपासूनच तब्बल चारशे गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्ते त्यांचा स्वागत यात्रेबरोबर असतील आणि हा ताफा जसजसा पुढे सरकेल तसतसा हा ताफा आणखी विशाल होणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. या स्वागत यात्रेत केवळ मंत्री गुलाबराव पाटलांचे स्वागत होणार नाही किंवा ते नुसतं आभार प्रदर्शन करणार नाहीत. या यात्रेत जागोजागी त्यांची तोफही धडाडणार आहे.

Read Also : Jalgaon : १७ वर्षीय भावाला खटकलं २० वर्षाच्या बहिणीचं प्रेम

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी