मुख्यमंत्री अन् पंतप्रधानपदाविषयी पाटलांचं विधान; जर उद्धव ठाकरेंना 'हे' पद मिळालं तर गुलाबराव पाटलांना व्हायचंय सीएम

जळगाव
भरत जाधव
Updated Jun 06, 2022 | 09:04 IST

शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader) आणि राज्याचे मंत्री (Minister ) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आपल्या बेधडक वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काल त्यांचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवशी त्यांनी केलेल्या भाषणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी बोलाताना त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) पद आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

 then I can be the Chief Minister- Minister Gulabrao Patil
...तर मी मुख्यमंत्री होऊ शकतो- मंत्री गुलाबराव पाटील  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किलपणे व्यक्त केली मुख्यमंत्री पद मिळण्याची इच्छा
  • उद्धव ठाकरे हे पंतप्रधान झाले तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो.- गुलाबराव पाटील
  • राजकरणात आपण आलो नसतो तर किर्तनकार झालो असतो- गुलाबराव पाटील

Gulabrao Patil wants to be CM : जळगाव:  शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader) आणि राज्याचे मंत्री (Minister ) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आपल्या बेधडक वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काल त्यांचा वाढदिवस होता. आपल्या वाढदिवशी त्यांनी केलेल्या भाषणानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी बोलाताना त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) पद आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. परंतु त्यासाठी त्यांनी जर तरची अट ठेवली आहे. पाटील म्हणाले की, जर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान (Prime Minister) झाले तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. 

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्किलपणे पण का होईना मुख्यमंत्रीपदाचा मनोदय बोलून दाखवला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणापूर्वी आमदार किशोर पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदानंतर गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, असं म्हटलं. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, किशोर पाटील म्हणाले की मला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी. आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते पंतप्रधान झाले तर मला मुख्यमंत्री होता येईल, असं पाटील म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकीकडे आगामी काळात आमचाच मुख्यमंत्री होईल जाहीर वक्तव्य करत असतानाच दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने केलेल्या भाषणात मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवल्यानं चर्चा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना आपला मुख्यमंत्री असावा यासाठी हट्ट धरताना दिसत आहे. 

अर्ध्या कीर्तनकारांची दुकानं बंद केलं असतं

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या पाळधी या गावात सभा पार पडली. गुलाबराव पाटील म्हणाले की, हा गुलाबराव पाटील मंत्री होणे शक्यच नव्हते. जनतेच्या आशिर्वाद प्रेमामुळे ते होऊ शकलं. मी राजकारणात आलो नसतो तर किर्तनकार झालो असतो, असंही ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की, आता मंत्री असल्याने विरोधकांना पाहिजे त्या शब्दात उत्तर देता येत नाही, मात्र कीर्तनकार असतो तर इंदुरीकर महाराजांच्या सोबतच राहिलो असतो. अर्ध्या कीर्तनकारांची दुकानं बंद करून टाकली असती, असंही ते म्हणाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी