पैसे मिळाले नाही म्हणून SBIचे ATM चोरले

जळगाव
रोहन जुवेकर
Updated Jun 24, 2021 | 06:17 IST

चोरट्यांनी एटीएम मशिन चोरले. या प्रकरणी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या खरजई नाक्यावरील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

Jalgaon: ATM Machine Stolen With Cash Of Rs 17 Lakh From Chalisgaon
पैसे मिळाले नाही म्हणून SBIचे ATM चोरले 

थोडं पण कामाचं

  • पैसे मिळाले नाही म्हणून SBIचे ATM चोरले
  • १७ लाखांच्या रकमेसह SBIचे ATM चोरले
  • महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव जवळच्या खरजई नाका परिसरातील घटना

जळगाव: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. चोरट्यांनी मध्यरात्री एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. पण झटपट एटीएम फोडणे शक्य नाही याची जाणीव होताच चोरट्यांनी एटीएम मशिन चोरले. या प्रकरणी चाळीसगावच्या खरजई नाक्यावरील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. Jalgaon: ATM Machine Stolen With Cash Of Rs 17 Lakh From Chalisgaon

स्टेट बँकेचे एटीएम मशिन आणि एटीएममधील १७ लाखांची रोकड या दोन्हीची चोरट्यांनी एकाचवेळी चोरी केली. तसेच एटीएम उखडून नेताना ज्या ठिकाणी मशिन बसवले होते त्या जागेचे नुकसान केले. स्टेट बँकेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत या सर्व बाबींचा उल्लेख आहे. पण या घटनेमुळे चोरट्यांमध्ये पोलिसांविषयी काही धाक उरला नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. 

चोरटे चाळीसगावच्या खरजई नाक्यावरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएममधील पैसे चोरण्यासाठी मध्यरात्री दिडच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. पण एटीएम मशिनच्या धातुचा पत्रा तोडणे कठीण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. एटीएम फोडता येत नसल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी एटीएम मशिनच उखडून काढले आणि चोरुन नेले. या एटीएममध्ये असलेली १७ लाखांची रोख रक्कम होती. या प्रकरणी स्टेट बँकेने एटीएम मशिन आणि त्यातील रक्कम चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे. यात एटीएम जिथे बसवले होते त्या जागेचे चोरट्यांनी नुकसान केल्याचा उल्लेख आहे. 

पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर तपास सुरू केला आहे. एटीएम मशिन मोठे असते त्यामुळे त्याच्या चोरीसाठी मोठ्या वाहनाची आवश्यकता आहे. हा एक मुद्दा विचारात घेऊन पोलिसांनी मोठ्या वाहनांबाबत चौकशी सुरू केली आहे. यापूर्वी एटीएम फोडणे किंवा एटीएम चोरणे अशा चोऱ्या करणाऱ्यांपैकी कोण कुठे आहे, याचाही तपास सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी