Jalgaon : महाप्रबोधन यात्रेत राडा, शिवसेनेच्या आक्रमक नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

shivsena : जळगावात महाप्रबोधन यात्रा घेण्यात आली. यावेळी सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या कारणावरून शरद कोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Jalgaon: Rada, an aggressive Shiv Sena leader was detained by the police during the Mahaprabodhan Yatra
Jalgaon : महाप्रबोधन यात्रेत राडा, शिवसेनेच्या आक्रमक नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेची (ठाकरे) जळगावमध्ये महाप्रबोधन यात्रा
  • गुलाबराव पाटलांवर टीका
  • युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना घेतलं ताब्यात

जळगाव : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. यात्रेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरू झाली. ही सध्या जळगाव जिल्ह्यात सुरू असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रबोधन यात्रेतील शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी भाषणात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि शिंदे गटावर टीका केली आहे. दरम्यान, आज चोपडा येथील सभेपूर्वीच पोलिसांनी शरद कोळी यांना ताब्यात घेतल्याने गोंधळ झाला.   (Jalgaon: Rada, an aggressive Shiv Sena leader was detained by the police during the Mahaprabodhan Yatra)

अधिक वाचा : BHANDARA । रस्त्यावर खतरनाक थरार; वाळू माफियांनी तहसीलदारांच्या गाडीवर जेसीबी अन् गोळीबार...

दोन दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात सुरू असून तिथे सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांच्या आक्रमक भाषणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुषमा अंधारेंनी गुजरातला गेलेल्या प्रकल्पांवरुनही भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्न उपस्थित करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर शरद कोळी यांनी " सुषमा अंधारेंबाबत काही बोललं गेलं तर घरात घुसून मारू" अशा इशारा दिला. 

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra : ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं; ऐका घटनाक्रम दस्तुरखुद्द नितीन राऊतांकडून…

जळगावात चोपडा येथील शिवसेनेच्या महाप्रबोधन सभेपूर्वीच शरद कोळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा गोंधळ उडाला. शरद कोळी यांना प्रक्षोभक भाषण करण्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे पोलीस आणि शिवसैनिक आमनेसामने आले. शरद कोळी यांना पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा शिवसैनिकांचा पवित्रा होता. त्यातूनच त्यांच्यात तुतू-मैमै झाली. पोलिसांनी कोळी यांना ताब्यात घेतल्यानंतर सुषमा अंधारे, संपर्कप्रमुख संजय सावंत व  शिवसैनिकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात गेल्या. या गोंधळानंतर जळगावातील वातावरण चांगलेच तापले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी