रोहिणी खडसेंपासून आपल्या जीवाला धोका आमदार चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

mla chandrakant patil targeted rohini khadase : जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीचे मतदान २१ डिसेंबर रोजी पार पडले असून, मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत

mla chandrakant patil targeted rohini khadase
रोहिणी खडसेंपासून आपल्या जीवाला धोका - आमदार चंद्रकांत पाटील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
  • शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप
  • आमदारांचे अवैध धंदे बंद करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन

जळगाव : शिवसेना आमदार (Shiv Sena MLA) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse Khewalkar) यांनी आपणास चोप देण्याचे वक्तव्य केलं असून, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. जळगाव (Jalgaon district) बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.

मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीचे मतदान २१ डिसेंबर रोजी पार पडले असून, मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या अंगावर धावून आल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यानंतर रोहिणी खडसें यांनी महिलांची छेडखानी करणाऱ्यांना चोपच नाहीतर तर त्यांचे हात तोडून टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. त्यानंतर याविरोधात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. तर राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर खोटा आरोप केल्याची तक्रार शिवसेनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप

दरम्यान शनिवारी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन रोहिणी खडसे खेवलकर यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीनंतर मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटस वरून पुन्हा वाद उफळला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत २४ डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेनेच्या वतीने याबाबत परस्परविरोधी गुन्हा दाखल केला असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

आमदारांचे अवैध धंदे बंद करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन

आमदार चंद्रकांत पाटील यांचे अनेक अवैद्य धंदे असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.  आमदारांचे अवैध धंदे बंद करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले होते. त्यानुसार अवैध धंदे बंद होत असल्याने आमदारांनी जाणीवपूर्वक आरोप केल्याचं म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान , महाविकासआघाडी सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर नेत्यांचे वाद मात्र काही थांबताना दिसून येत नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी