मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह बोलला, शिवसेना कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर त्याला फोडला

जळगाव
भरत जाधव
Updated Mar 28, 2022 | 11:09 IST

मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात पोस्ट टाकणं जळगावमधील (Jalgaon) एका व्यक्तीला चांगलेच महागात पडलं आहे. एखाद्या मोठ्या पदाच्या व्यक्तीविषयी किंवा राजकीय व्यक्तीविषयी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट टाकताना काळजी घ्या.

man offensive post About Cm Thackeray
मुख्यमंत्र्याविरोधात आक्षेपार्ह बोलणाऱ्याला बेदम मारहाण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या व्यक्तीनं थेट मुख्यमंत्र्याविषयी सोशल मीडियावर (offensive post against) आक्षेपार्ह पोस्ट टाकली.
  • जळगाव शहराच्या एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट

जळगाव : मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात पोस्ट टाकणं जळगावमधील (Jalgaon) एका व्यक्तीला चांगलेच महागात पडलं आहे. एखाद्या मोठ्या पदाच्या व्यक्तीविषयी किंवा राजकीय व्यक्तीविषयी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट टाकताना काळजी घ्या. आपण कोणत्या प्रकारची पोस्ट टाकत आहोत, त्यातून कोणाचा अपमान होत नाही ना, कोणाच्या भावनांना ठेच लागत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. 
दरम्यान जळवगावमधील व्यक्तीचं ही तेच चुकलं.

या व्यक्तीनं थेट मुख्यमंत्र्याविषयी सोशल मीडियावर (offensive post against) आक्षेपार्ह पोस्ट टाकली, त्यानंतर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान ही घटना रविवारी संध्याकाळी धरणगाव येथे घडली. मुख्यमत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचं नाव हेमंत द्वितीये आहे.  या व्यक्तीने सोशल मीडियावर जळगाव शहराच्या एका ग्रुपवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. 

ही पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर हेमंत द्वितीये हा शहरातील आयनॉक्स थिएटरला चित्रपट पाहण्यासाठी आला होता. शिवसेना कार्यकर्ते त्याच्यावर पाळत ठेवून होते. चित्रपटगृहातून बाहेर पडताच त्याला बेदम मारहाण करत शिवसेना कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकल्याचा निषेध व्यक्त केला.आपल्याकडून चुकीची पोस्ट टाकली गेली, त्याबद्दल माफी मागतो, असं हेमंत द्वितीये याने म्हटल्याने त्याला नंतर सोडून देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट टाकली जाईल त्यांना असाच जाहीर चोप दिला जाईल, असा इशारा यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी