महाराष्ट्राच्या सुपुत्राला पठाणकोटमध्ये वीरमरण

जळगाव
रोहन जुवेकर
Updated Nov 15, 2021 | 00:46 IST

Mangalsingh Pardeshi martyr in Pathankot जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र मंगलसिंग विजयसिंग परदेशी यांना पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. मंगलसिंग विजयसिंग परदेशी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सावखेडाचे आहेत.

Mangalsingh Pardeshi martyr in Pathankot
महाराष्ट्राच्या सुपुत्राला पठाणकोटमध्ये वीरमरण 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्राच्या सुपुत्राला पठाणकोटमध्ये वीरमरण
  • मंगलसिंग विजयसिंग परदेशी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सावखेडाचे आहेत
  • मंगलसिंग यांच्या पश्चात आई-वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी आणि तीन अपत्य असा मोठा परिवार

Mangalsingh Pardeshi martyr in Pathankot । जळगाव: जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र मंगलसिंग विजयसिंग परदेशी यांना पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. मंगलसिंग विजयसिंग परदेशी हे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सावखेडाचे आहेत. गोळी लागल्यामुळे मंगलसिंग विजयसिंग परदेशी यांना वीरमरण आले.

मंगलसिंग विजयसिंग परदेशी अठराव्या वर्षीच सैन्यात दाखल झाले होते. ते भारतीय सैन्यात ईएमई विभागात नायक पदावर कार्यरत होते. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण सावखेडातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले होते. बालपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड होती. 

मंगलसिंग यांच्या पश्चात आई-वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी आणि तीन अपत्य असा मोठा परिवार आहे. मंगलसिंग यांच्यावर मंगळवार १६ नोव्हेंबर २०२१ रोजी सावखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी