मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या

जळगाव
Updated Aug 25, 2019 | 15:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळघाव शहरातील कासमवाडी परिसरात ही घटना घडली आहे.

Ex MNS leader killed in Jalgaon
मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या
  • श्याम दीक्षित यांची दगडाने ठेचून हत्या
  • सकाळच्या सुमारास अज्ञातांनी केली हत्या
  • श्याम दीक्षित यांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ

जळगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृतक इसमाचं नाव श्याम दीक्षित असं आहे. जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्याम दीक्षित यांचा मृतदेह आढळला. श्याम दीक्षित यांचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्याम दीक्षित यांचा मृतदेह कासमवाडी परिसरातील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात आढळून आला. काही नागरिकांनी श्याम दीक्षित यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहिलं आणि त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. 

श्याम दीक्षित हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगावमधील माजी पदाधिकारी होते. त्यांनी जळगाव शहर मनसे उपाध्यक्षपद सांभाळलं होतं. श्याम दीक्षित यांच्या मृत्यू मागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 

श्याम दीक्षित हे शनिवारी त्याच परिसरात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर रात्री ते घरी गेले. रात्रीच्या सुमारास श्याम दीक्षित यांना एक फोन आला आणि ते घरातून बाहेर गेले अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिकारी श्याम दीक्षित यांच्या मोबाइलमधील कॉल डीटेल्स काढून अधिक तपास करत आहेत.

श्याम दीक्षित यांच्या हत्ये मागे राजकीय वाद आहे? की पूर्ववैमनस्यातून हत्या केली आहे? की हत्येमागे काही वेगळंच कारण आहे? या सर्व शक्यता पडताळून पोलीस तपास करत आहेत. जळगावमधील औद्योगिक वसाहत पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...