Jalgaon : जळगावात महिलेच्या पोटातून काढला साडे चार किलोचा ट्युमर, महिलेला वाचवण्यात डॉक्टरांना यश

जळगावमधील एका आदिवासी महिलेच्या पोटात साडे चार किलोचा ट्युमर झाला होता. डॉक्टरांनी या महिलेवर शस्त्रक्रिया करून हा ट्युमर काढला आहे आणि या महिलेचे प्राण वाचवले आहेत.

surgery
शस्त्रक्रिया  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जळगावमधील एका आदिवासी महिलेच्या पोटात साडे चार किलोचा ट्युमर झाला होता.
  • डॉक्टरांनी या महिलेवर शस्त्रक्रिया करून हा ट्युमर काढला आहे
  • आणि या महिलेचे प्राण वाचवले आहेत.

Surgery : जळगाव : जळगावमधील एका आदिवासी महिलेच्या पोटात साडे चार किलोचा ट्युमर झाला होता. डॉक्टरांनी या महिलेवर शस्त्रक्रिया करून हा ट्युमर काढला आहे आणि या महिलेचे प्राण वाचवले आहेत. 

जळगाव शहरातील नारायणवाडी भागात असणाऱ्या डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या जनसेवा हॉस्पिटल मध्ये एका गरीब आदिवासी महिलेवर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रिक्रियेतून तब्बल साडे चार किलोचा मांसाचा गोळा काढुन सदरच्या महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टर मंडळींना यश आले.  या आदिवासी महिलेला अनेक वर्षांपासून पोट दुखीचा त्रास होता. पोटात मोठी गाठ असून त्या मुळे पोटदुखी आहे हे निदान झालेले होते. मात्र सदर महीला गरीब असल्याने शस्त्रक्रिया करण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. ही महिला डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या जनसेवा हॉस्पिटल मध्ये पोहोचली असता कमीत कमी खर्चात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर ४.५ किलोचा ट्युमर काढण्यात आला. शस्त्रक्रियेसाठी डॉ.महेश काळे (सर्जन) डॉ.चंद्रकांत बारेला,डॉ.नरेंद्र पाटील भुलतज्ञ, डॉ.सौ सोनाली बारेला,डॉ.सौ.मनीषा लाडे,स्त्री रोगतज्ञ,कर्मचारी राकेश पावरा,प्रिया वासकले, ममता चौहान,राहुल बारेला यांनी परीश्रम घेतले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी